Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

NagpurNewsUpdate : धक्कादायक : गृहमंत्र्यांच्या शहरातही कार चालकाने वाहतूक पोलिसाला बॉनेटवर फरफटत नेले

Spread the love

पुण्याच्या पिंपरी चिंचवडनंतर नागपुरातही  एका वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. नागपूर सक्करदरा चौकात हि  धक्कादायक  घडली आहे. गेल्या महिनाभरापूर्वी अशीच घटना पुण्यात घडली होती. या घटनेतील वाहतूक पोलिसांचा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गौरव केला होता आता गृहमंत्र्यांच्याच शहरात आरोपीने हे दु:साहस केले  असल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश चव्हाण असे कार चालकाचे नाव असून, अमोल चिदमवर असे बोनेटवरून फरफटत नेण्यात आलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.

नागपूरच्या  सक्करदरा चौकात वाहतूक  पोलीस वाहन चालकांची तपासणी करत असताना हा प्रकार घडला आहे. या कार चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडण्याचा प्रयत्नही केला, मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत बोनेटवरून उडी घेतल्यानं त्याचा थोडक्यात जीव बचावला. चालकाने कार न थांबविता वाहतूक पोलिसाला तब्बल पाचशे मीटर अंतरापर्यंत बोनेटवरून फरफटत नेले . यावेळी रस्त्यावरील दुसऱ्या दुचाकीस्वारांनाही  किरकोळ अपघात झाला . हा सर्व  प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे . या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणातील आरोपी आकाश चव्हाणवर आधीही गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!