Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : भाजपच्या “त्या ऑडिओ क्लिप” चा उमेदवार सतीश चव्हाण यांच्याकडून जाहीर निषेध

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया चालु असतांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ध्वनीमुद्रीत आवाज गुंटुर येथील मोबाईल वरुन सुपरइंपोज करुन तसेच त्या पाठोपाठ एका स्थानिक त्रिस्तरीय भाजपा नेत्यांचा आवाजात विरोधी पक्षाचा उमेदवाराच्या (भाजप) प्रचाराचा आडीओ मेसेज चालवला जात आहे. भाजपला आपला पराभव दिसतोय त्यामुळे असे उपद्व्याप ते करत आहेत. त्यांच्या या कृतीचा आम्ही जाहीर निषेध करतो, अशा शब्दात महाविकास आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच या संबंधित व्यक्तीच्या विरोधात मी निवडणूक निर्वाचन अधिकारी तसेच औरंगाबाद पोलीस आयुक्तांना लेखी पत्राद्वारे कळवले आहे तसेच संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची प्रक्रिया चालु असतांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ध्वनीमुद्रीत आवाज गुंटुर येथील मोबाईल वरुन सुपरइंपोज करुन तसेच त्या पाठोपाठ एका स्थानिक त्रिस्तरीय भाजपा नेत्यांचा आवाजात विरोधी पक्षाचा उमेदवाराच्या (भाजप) प्रचाराचा आडीओ मेसेज चालवला जात आहे. Tru कॉलरवर ८६३४५१२४५४ हा मोबाईल नंबर खासदार सुप्रियाताई सुळे यांचा वैयक्तीक असल्याचे बेमालुमपणे भासवले आहे.

हे अतिशय निंदनीय राजकारण असून विरोधी पक्षाचा (भाजपा) बॅलट पध्दतीवर विश्वास नसल्याचे निदर्शक आहे. त्यामुळे मोबाईल क्रमांका संबंधी केल्या गेलेल्या तंत्रज्ञानाच्या फसव्या करामतीची दखल घेणे आवश्यक आहे. तरी कृपया निवडणूक आयोग तसेच संबंधीत यंत्रनानी या करामतीच्या मागील व्यक्तींना शोधून काढून योग्य ती कार्यवाही व संबंधीतास योग्य ते शासन करावे अशी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना मित्र पक्ष आघाडी चे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांनी केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!