Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी  प्रशासकीय यंत्रणा सज्ज

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदार पदवीधर मतदार संघाची निवडणूक 01 डिसेंबर रोजी होत असून मतमोजणी 03 डिसेंबर रोजी होणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असल्याचे प्रशासनाकडून कळविण्यात आलेले आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाकडून करण्यात आलेली तयारी पुढीलप्रमाणे आहे.

जिल्ह्यात एक लक्ष सहा हजार 379 मतदार आहेत. त्यामध्ये पुरूष 74959, महिला 31415 व इतर 5 आहेत. तर सर्वाधिक मतदान केंद्रे औरंगाबाद तालुक्यात 117 आहेत. सर्वात कमी मतदान केंद्रे खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यात प्रत्येकी पाच आहेत. सिल्लोडमध्ये 15, कन्नड 14, फुलंब्री 6, पैठण 15, गंगापूर 14 आणि  वैजापूर 15 असे एकूण 206 मतदान केंद्रे आहेत.  मतदान प्रक्रियेसाठी एकूण 206 मतदान केंद्रांसाठी 306 वाहने उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

निवडणुकीदरम्यान विविध प्रशिक्षणाद्वारे अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. यामध्ये नोडल अधिकारी, आरोग्य नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, सुक्ष्म निरीक्षक यांचे प्रशिक्षण पार पडले असून त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठकही पार पडलेली आहे. जिल्ह्यात एकूण 181 प्राप्त टपाली मतपत्र‍िका आहेत. स्वीप कार्यक्रमांतर्गत कोरोना पार्श्वभूमी आणि राजकीय पक्षांची जागरूकता, कोरोना पार्श्वभूमी आणि मतदान केंद्र व्यवस्थापन, मतपत्र‍िकेवर पसंतीक्रमाने मतदान कसे करावे ?, कोरोना पार्श्वभूमी आणि मतदानाच्या दिवशी मतदारांनी घ्यावयाची काळजी व खबरदारी  आणि पदवीधर निवडणूक – मतमोजणी प्रक्रिया याबाबत प्रशिक्षणासह चलचित्रफीत निर्मित करण्यात आलेल्या आहेत. त्यामाध्यमातून जागृती करण्यात आलेली आहे.

सध्या कोविड 19 आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता तालुकानिहाय आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपलब्धता आहे. यामध्ये जिल्ह्यातील एकूण 206 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेसाठी 104 अधिकारी, 206 कर्मचारी, जिल्हा कोविड आरोग्य केंद्र, जिल्हा कोविड रूग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये एकूण 99 अधिकारी आणि एकूण 80 रूग्णवाहिका उपलब्ध आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!