MaharashtraNewsUpdate : बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांच्या कन्या वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ, डॉक्टर शीतल आमटे – करजगी यांनी आत्महत्या केली  असल्याचं वृत्त आहे. शीतल आमटे सध्या आनंदवनची संपूर्ण जबाबदारी सांभाळत होत्या. मागील काही महिन्यांपासून आमटे परिवारात अंतर्गत संघर्ष पेटला होता.  या अंतर्गत गृहकलहातून त्यांनी  आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.


डॉ. शीतल आमटे या विकास व भारती आमटे यांच्या कन्या होत्या. आमटे कुटुंबीयांचा समाजसेवेचा वारसा त्यांनीही जोपासला होता. २००३ मध्ये नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसचं त्यांनी शिक्षण घेतलं होतं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आनंदवनातच काम करण्याचा निर्णय घेतला. शीतल आमटे या अपंगत्व विशेषज्ज्ञ म्हणूनही प्रसिद्ध होत्या.

Advertisements

डॉ. शीतल आमटे यांनी विषाचे इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे समजताच  त्यांना तातडीने वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असतानाच डॉ. शितल यांचा मृत्यु झाल्याचं घोषित केलं. कुष्ठरोग्यांच्या आयुष्यात आनंद पेरणाऱ्या आनंदवनमध्येच ही धक्कादायक घटना घडल्याने सामाजिक वर्तुळ हादरलं आहे. गेल्या काही  दिवसांपासून शीतल आमटे- करजगी मानसिक तणावात होत्या त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याचं बोललं जात आहे.

Advertisements
Advertisements

डॉ. शीतल आमटे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्हच्या माध्यमांतून आनंदवानातील महारोगी सेवा समितीच्या कामाबद्दल, विश्वस्तांबद्दल आणि कार्यकर्त्यांबद्दल गंभीर आरोप केले होते. मात्र त्यानंतर दोन तासातच हे फेसबुक लाइव्ह डिलीट करण्यात आलं होतं. डॉ. शीतल आमटे यांच्या या फेसबुक लाईव्हनंतर बरीच चर्चा झाली मात्र आमटे कुटुंबांकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात शीतल आमटेंनी केलेले आरोप फेटाळून लावले होते.

दरम्यान ‘संपूर्ण आमटे कुटुंब बाबा आमटेंच्या कार्याशी मागील तीन पिढ्यांपासून समरस आहे. आमच्या कुटुंबातील डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी आमच्या कार्यात योगदान दिले आहे. तथापि, त्या सध्या मानसिक ताण, नैराश्याचा सामना करीत आहेत. त्यांनी अलीकडेच समाज माध्यमांवर तशी स्पष्ट कबुलीही दिली आहे. त्यांच्या निवेदनामुळे कोणचाही गैरसमज होऊ नये म्हणून आमटे परिवार हे संयुक्त निवेदन परस्पर विचारविनिमय करून प्रस्तुत करीत आहे,’ असं त्या निवेदनात स्पष्ट केलं होतं.

 

आपलं सरकार