Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात ५५४४ नव्या रुग्णांची नोंद , ८५ रुग्णांचा मृत्यू

Spread the love

गेल्या २४ तासात काल दिवसभरात ५ हजार ५४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात एकूण ४ हजार ३६२ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर आतापर्यंत एकूण रुग्णांपैकी एकूण १६ लाख ८० हजार ९२६ रुग्ण बरे झालेले आहेत. याबरोबरच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे

आज प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार, सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.५९ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. या बरोबरच राज्यात ५ लाख २६ हजार ५५५ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून एकूण ६ हजार ८१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटीनमध्ये आहेत. दरम्यान, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०८,०४,४२२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२०,०५९ (१६.८५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

Click to listen highlighted text!