Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : विभागातील विकास प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपला अधिक बळ द्या : खा. भागवत कराड

Spread the love

औरंगाबाद  विभागातील विकासाचे प्रश्न मार्गी लावू, असा निर्धार खासदार डॉ. भागवत कराड यांनी शनिवारी केला. मराठावाडा पदवीधर मतदार संघातील भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ खासदार डॉ. कराड यांनी शारदा मंदिर, सरस्वती भुवन, शहरातील इतर शैक्षणिक संस्थासह विविध ठिकाणी बैठका घेत मतदारांशी संवाद साधला.

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असताना प्रामुख्याने मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी, कॉर्नर बैठकांना महत्त्व प्राप्त झाले आहे. भाजपकडून व्यक्तिगत पातळीवर मतदारांशी संपर्क साधून निवडणुकीचे महत्व समजवून सांगितले जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचा कारभार यशस्वीपणे सुरू आहे. विभागातील विकास प्रश्न मार्गी लावण्यासाठी भाजपला अधिक बळ द्या, असे आवाहन त्यांनी करत पदवीधरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे डॉ. कराड यांनी नमूद केले. यावेळी प्रा. गजानन सानप, समीर राजूरकर, डॉ. रामदास वनारे, मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ साळवे आदी उपस्थित होते.

राज्यातील आघाडी सरकार प्रत्येक कामात अपयशी ठरलेले आहे. पदवीधर शेतकरी मतदारांना सरकारवरील रोष व्यक्त करण्याची हीच चांगली संधी आहे. आघाडी सरकारवरील रोष मतदानातून व्यक्त करा, असे आवाहन भाजप नेत्या, जिल्हा परिषदेच्या सभापती अनुराधा चव्हाण यांनी केले. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खु, शिरोडी बु, डोंगरगांव शिव, पिंपळगाव वळण, शेलगांव, जानेफळ यासह तालुक्यात ठिकठिकाणी बैठका, सभा घेत मतदारांशी संवाद साधत आहेत. याअंतर्गत वाणेगाव येथे आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब तांदळे, एकनाथ धटिंग, कैलास सोनवणे, राम बनसोड, बाळासाहेब सोटम, सरपंच कृष्णा गावंडे, सूचित बोरसे, विलास आटुळे, अजय नागरे, मंगेश सोटम, संजय वाहटूळे , जयलाला काकरवाल, वंदना जाधव उपस्थित होते.

मूळ जळगावचे परंतु सध्या औरंगाबाद येथे वास्तव्यास असलेल्या मतदारांसोबत आमदार राजू भोळे यांनी बैठक घेत प्रचार केला. यावेळी अॅड. प्रसन्ना कुट्टी, अॅड. चैताली चौधरी-कुट्टी, सुरेश कोलते पाटील, लेवा पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष मधुकर सरोदे, जगन्नाध किनगे, विकास पाटील, हितेश नारखेडे,अनंत वराडे, जे. पी. पाटील, प्रवीण जंगले, अशोक बढे, श्रीकृष्ण महाजन, अॅड. दीपक पाटील, महेश कोल्हे, महेश चौधरी, राजू पाटील उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!