Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : हैदराबादचे नामांतर करण्याच्या योगींच्या विधानावरून राजकारण तापले , खा. ओवैसींचे कडक उत्तर

Spread the love

आंध्र -तेलंगणाची राजधानी असलेल्या ऐतिहासिक हैदराबाद शहराचे नाव बदलण्याच्या कळीच्या मुद्द्याला  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हात  घातला आहे . त्यामुळे ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण चांगलंच तापलं आहे. काल योगी यांनी  मल्काजगिरी या ठिकाणी रोड शो केला. त्यावेळी आपण हैदराबादला भाग्यनगर बनवायला आलो आहे अशी  योगी आदित्यनाथ यांनी तोफ डागली. त्याला उत्तर देताना एमआयएमचे खा. असिदोद्दीन ओवैसी यांनी प्रत्युत्तर देताना योगींच्या आणि भाजपच्या या वक्तव्याला हैदराबादचे मतदार चोख उत्तर देतील असे प्रत्युत्तर दिले आहे.

या वादग्रस्त विषयावर बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले कि , “मला काही लोकांनी विचारलं की हैदराबादचं नाव भाग्यनगर होऊ शकतं का? मी म्हटलं का नाही? आम्ही फैजाबादचं नाव अयोध्या केलं, अलाहाबादचं नाव प्रयागराज केलं. उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता आल्यानंतर हे बदल घडले मग हैदराबादचं नाव भाग्यनगर का होणार नाही? ” असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. जे.पी. नड्डा, योगी आदित्यनाथ यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या हे देखील हैदराबादेत तळ ठोकून आहेत.

दरम्यान भाजपने उपस्थित केलेल्या या कळीच्या मुद्यावर बोलताना एमआयएमचे खा. असिदोद्दीन ओवैसी यांनी चोख उत्तर दिले असून ते म्हणाले कि , हैद्राबाद हा आमचा ब्रँड आहे. चारमिनारमुळे जगात भारताची ओळख आहे. हि ओळख मिटविण्याचा प्रयत्न  करणारांना हैद्राबादी जनता चोख उत्तर देईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!