Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : आकाशवाणी चौकात टू वे ट्राफिक चा प्रयोग यशस्वी, पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांची माहिती

Spread the love

औरंगाबाद – गेल्या आठवडाभरात आकाशवाणी चौकात रोज संध्याकाळी ६ते ८ राबवल्या जाणार्‍या टू वे ट्राफिक प्रयोगाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे इमेल पोलिस आयुक्तालयाला प्राप्त झाले आहेत. पुन्हा एकदा हाच प्रयोग नव्याने राबवला जाईल अशी माहिती पोलिस आयुक्त डाॅ.निखील गुप्ता यांनी दिली.

आठवडा भर वाहतूक शाखेने हा प्रयोग यशस्वी करण्याकरता चांगले प्रयत्न केले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख आणि त्यांच्या पथकाची कामगिरी कौतूकास्पद होती असेही आयुक्त म्हणाले. आकाशवाणी, सेव्हनहिल, जवाहरकाॅलनी, महेशनगर, रघुवीरनगर या ठिकाणच्या आस्थापनातील अधिकार्‍यांनी टू वे ट्राफिकमुळे वेळ वाचला व शांततेत वाहने चालवण्याचा जालना रोडवरचा आनंद घेता आला अशा प्रतिक्रियाही प्रत्यक्ष भेटून,फोनवर मिळाल्याचे डाॅ.गुप्ता म्हणाले. शहरातील इतर परिसरातही वाहतूक नियंत्रणासाठी आपण स्वता:प्रयत्न करंत असल्याचे व नवनवीन प्रयोग राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!