Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : स्टाफ सिलैक्शन कमीशन आॅनलाईन परिक्षेत काॅपी, एक अटक,दोन फरार

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – टाटा कन्सलटन्सी सर्विसेस तर्फे स्टाफ सिलैक्शन कमीशन च्या आॅनलाईन परिक्षेत मित्राच्या हाॅलटिकीटवर परिक्षा देणार्‍या भामट्याला सिडको औद्योगिक पोलिसांनी बेड्या ठोकल्या.या प्रकरणातील दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

Advertisements

अर्जून बाबूलाल बिघोत असे अटक आरोपीचे नाव आहे.तर फरार अमोल गडवे व अन्य एक तिघेही रा.केळगाव औरंगाबाद अशी संशयितांची नावे आहेत. २७नोव्हेंबर रोजी रात्री ९वा. चिकलठाणा औद्योगिक परिसरातील आय आॅन डिजीटल केंद्रावर अटक आरोपी अर्जून बिघोत अमोल गडवे याच्या नावाचे हाॅल टिकीट व ओळख पत्र वापरुन परिक्षा देत असल्याचे आय टी. सेल चे प्रमुख प्रशांत महांकाळ यांना आढळले. त्यांनी बिघोत ची झडती घेतली असता एटीएम ट्रान्समीटर, ब्लू टूथ डिवाईस, मख्खी एअर फोन अशा वस्तू जप्त करंत सिडको औद्योगिक पोलिसांच्या हवाली केले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संजय मांटे तपास करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!