Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजच्या दौऱ्यात नेमके काय केले ? जाणून घ्या लसीविषयी

Advertisements
Advertisements
Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या दौऱ्यात अहमदाबाद, हैदराबाद नंतर आज पुण्याच्या सिरम इन्स्टीट्यूटला भेट दिली.  आपल्या या भेटीत पंतप्रधानांनी सिरम इन्स्टीट्यूटमधील वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांबरोबर तासभर चर्चा केली. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पूनावाल कुटुंबीय तिथे उपस्थित होते. सिरम ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे. सध्या सर्वांचच लक्ष सिरम इन्स्टीट्यूटकडे लागलं आहे. ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे. पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींनी सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. मोदींनी यावेळी करोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.


सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी या वर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत लस बाजारात येईल असं सांगितलं आहे. सीरमने आत्ताच ४० दशलक्ष डोस तयार केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या लसीच्या अंतरिम परीक्षणात ती ७० टक्के प्रभावी असल्याचं सांगितलं जात आहे.  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ‘कोविडशिल्ड’ या ब्रँडने लस बाजारात आणणार आहे. याशिवाय  हैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनी ‘कोव्हॅक्सिन’ नामक करोनावरील लस बाजारात आणणार आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मदतीने भारत बायोटेक या लसची निर्मिती करत आहे. आयआयएमएस दिल्लीसह विविध तीन ठिकाणी या लसीवर तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल सध्या सुरु आहे. ही लस कमीत कमी ६० टक्के प्रभावी ठरावी, असं कंपनीचं ध्येय असल्याचं भारत बायोटेकनं म्हटलं आहे. पुढील वर्षी २०२१ च्या मध्यावर ही लस बाजारात येईल असा अंदाज आहे. भारत बायोटेक ओडिशामध्ये या लसीसोबत इतर नऊ लसींवरही कंपनी काम करत आहे.

Advertisements

त्याच बरोबर अहमदाबादची झायडस कॅडिला कंपनी झायकोव्ह-डी ब्रँडनं करोनावरील लस बाजारात आणणार आहे. सध्या या लसीची फेज-२ मधील मानवी चाचणी सुरु आहे. पुढील वर्षी मार्च २०२१पर्यंत ही लस बाजारात येण्याचा अंदाज आहे. कंपनीने जुलै महिन्यांत सांगितले होते की, पुढील सात महिन्यांत लसीच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील. आणखी एक महत्वाची लस जी रशिया तयार करत आहे. स्पुटनिक-व्ही असं या लसीचं नाव असून यावर देखील भारतातील हैदराबादमधील डॉ. रेड्डीज प्रयोगशाळेत चाचण्या होत आहेत. ही लस ट्रायलमध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचं या प्रयोगशाळेनं म्हटलं आहे. रशिया या लशीचे काही मिलियन डोसेस तयार करण्यास तयार आहे.

Advertisements
Advertisements

‘कोविशिल्ड’ ७० टक्के परिणामकारक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम  आज अहमदाबादच्या झायडस कॅडिला कंपनीच्या प्रकल्पाला भेट दिली. इथे झायकोव्ही-डी लशीची निर्मिती सुरु आहे. ही स्वदेशी लस आहे. पंतप्रधान मोदींनी आज इथे स्वत:हा भेट देऊन लस निर्मिती आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला आहे. पंतप्रधान मोदी आता पुण्यातील मांजरी येथील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये येऊन कोविशिल्ड प्रकल्पाचा आढावा घेतला. अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.

दरम्यान “आज अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कचा दौरा करुन, स्वदेशी DNA आधारीत लशीबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. करोना प्रतिबंधक लस विकसित करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या टीमचे मोदींनी कौतुक केले. या प्रवासात भारत सरकार त्यांच्यासोबत मिळून काम करत आहे” असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. मोदींनी लस निर्मितीचे काम समजून घेताना झायडसच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकही केली.

खा. सुप्रिया सुळे यांची पंतप्रधानांवर टीका

दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. आम्हाला दिल्लीची सवय आहे. इथे मी ऐकलं १५०० कोटी, १६०० कोटींची विकासकामं होत आहेत. दिल्लीत तर एक लाख कोटींच्या पुढेच सगळ्या गप्पा असतात. आम्ही त्या गप्पा ऐकतो. हे कोण बोलतं ते तुम्हाला माहित आहे. ते आज पुण्यात आलेत. दुनिया घुम लो पुण्याच्या पुढे काही नाही. जगभर फिरलात तरीही लस शेवटी पुण्यातच सापडणार आहे. ती लस पुणेकरांनी शोधली आहे. अन्यथा म्हणायचे मीच शोधली असं म्हणत सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. मावळमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

एक लक्षात ठेवा पुण्यातच करोनावरची लस तयार झाली आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे. कुणी बाहेरुन क्लेम केला तर गैरसमज करु नये असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्युटचा दौरा केला. या दौऱ्यावर सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला. आता आज मी इथे सुनीलभाऊंच्या घरी आले आहे. पण इथला स्वयंपाक मी केलेला नाही. तसंच लस ही पुणेकरांनी आणली आहे हे लक्षात असू द्या.. इतर कुणी क्लेम केल्यास तुम्हाला सांगता येईल असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!