Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : असा असेल पंतप्रधानांचा उद्याचा दौरा , मुख्यमंत्री स्वागतासाठी येणार नाहीत

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दि . २८ नोव्हेंबर रोजी अहमदाबाहून निघून दुपारी १२ वाजून २५ मिनिटांनी  पुणे विमानतळावर पोहोचतील आणि  विमानतळावरूनच ते थेट सीरम इनस्टिट्यूटला हेलिकॉप्टरनं रवाना होतील. दुपारी १ वाजून ०५ मिनिटं ते २ वाजून ०५ मिनिटं या एक तासांच्या कालावधीत ते सीरम इनस्टिट्यूटला भेट देतील आणि  संबंधित अधिकाऱ्यांकडून कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया समजून घेतील. नंतर ते पुन्हा विमानतळाकडे रवाना होतील आणि  दुपारी २ वाजून ४५ वाजता  पुणे विमानतळावरून तेलंगाणाकडे रवाना होतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्यात प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यासाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी , उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी कोणीही उपस्थित राहू नये असे पंतप्रधान कार्यालयातून कळविण्यात आले आहे.  त्यांच्या अपचारिक स्वागताची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याऐवजी दिलीप वळसे पाटील करतील असे कळविण्यात आले आहे. दरम्यान  शरद पवार यांचेही  बारामती येथे नियोजित कार्यक्रम असल्याने त्यांचीही पंतप्रधानांची भेट होणार नाही असे सांगण्यात येत आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याची पूर्ण तयारी झाल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. पंतप्रधान या दौऱ्यात पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला  भेट देणार आहेत. कोरोना लसीच्या निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया ते समजून घेणार आहेत. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये कोरोना लसची निर्मितीचं काम सुरू आहे. त्यामुळे या लसीकडे संपूर्ण देशासह जगाचे लक्ष लागले आहे. त्या लसीच्या निर्मितीची प्रक्रिया कुठपर्यंत आली हे पाहण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी  उद्या २८ नोव्हेंबरला येत आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनानं तयारी सुरू केल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे.

100 देशांच्या राजदुतांचा नियोजित पुणे दौरा रद्द

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानंतर ४ डिसेंबरला १०० देशांचे राजदूत देखील सीरम इनस्टीट्युटला भेट देणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा रद्द झाला आहे. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुणे जिल्हा प्रशासनाला यासंदर्भात निरोप आला असून  दौऱ्याची पुढची तारीखही अद्याप निश्चित नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!