Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात आढळले ६१८५ नवे रुग्ण तर ४०८९ डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात  ६ हजार १८५ नवीन रुग्ण आढळून आले आहेत तर आज ८५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची  माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यात दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ०८ हजार ५५० इतकी झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची ही संख्या अधिक चिंता वाढवणारी आहे. दरम्यानच्या काळात  रुग्णसंख्येत घट झाली होती. मात्र, दिवाळीनंतर या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

गेल्या २४ तासात  ४ हजार ०८९ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहे. त्यामुळे  राज्यातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १६ लाख ७२ हजार ६२७ इतकी झाली आहे. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२. ४८ टक्के इतके झाले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना करोनामृतांची संख्या मात्र अद्याप कमी आहे. राज्यात आज ८५ रुग्ण दगावले आहे सध्या राज्यातील मृत्यूदर २. ५९ टक्के इतका आहे. तर, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या  ८७ हजार ९६९  इतकी आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ०६ लाख ३५ हजार ६०० चाचण्यांपैकी एकूण १८ लाख ०८ हजार ५५० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर, सध्या राज्यात ५ लाख २८ हजार ३९५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर, ७ हजार २४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!