Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : पोलिसांची अशीही माणुसकी , मतदार यादीवरुन शोधले हरवलेल्या लहानग्याचे आई बाप !!

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – वडिलांच्या मागे पायी फिरंत हर्सूल टी पाॅईंटवर भरकटलेल्या सहा वर्षाच्या मुलाला हर्सूल पोलिसांनी मतदार यादी वाचून आई वडलांना शोधले व मुलाला त्यांच्याकडे सूपूर्द केले. हर्सूल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांनी आई -वडिलांपासून हरवलेल्या या मुलाला त्याच्या कुटुंबीयांकडे सोपविण्याची यशस्वी प्रयत्न करून पोलिसांमध्ये आजच्या काळातही माणुसकी असल्याची प्रचिती दिली. या मुलाच्या कुटुंबीयांनी पोलिस निरीक्षक इंगोले यांचे आभार मानले .

Advertisements

हर्सूलच्या राधास्वामी  काॅलनीत राहणार्‍या सुनिता व सोमनाथ बनकर या मजूर दांपत्याला सुरक्षारक्षकाची नवी नोकरी मिळाली म्हणून नव्या जागेत जाण्यासाठी आज दुपारी ४वा.मयूरपार्क परिसरात सोमनाथ बनकर निघाले पण मागून त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आदित्य पाठलाग करंतोय हे त्यांच्या लक्षात आलं नाही. बनकर पुढे निघून गेल्यावर आदित्य हर्सूल टी पाॅईंटवर आला. गोंधळल्यामुळे रडवेला झाला होता. गस्तीवरील पोलिसांनी आदित्यला हर्सूल पोलिस ठाण्यात आणले त्याला खाऊ दिला. आई वडलांचे नाव विचारले आदित्यने सांगितले. शेवटी पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांनी शक्कल लढवली लोकसभा मतदारांची यादी मागवून आदित्यने सांगितलेले नाव शोधले. ते निघाले फुलंब्री भागातील शेरोडीचे शेरोडीच्या ग्रामपंचायत मधे फोन लावला असता बनकर दांपत्य हर्सूल परिसरातच किरायाच्या घरात राहाते असे समजले. पोलिस बनकर दांपत्याला शोधंत राधास्वामी काॅलनीत पोहोचले. पण बनकर घरी नव्हते. ते येण्याची वाट पाहात शेवटी  दुसर्‍या कामाला निघून गेले.

Advertisements
Advertisements

दरम्यान संध्याकाळी साडेसहा वा सोमनाथ बनकर घरी आल्यावर घरातून मुलगा बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. तेही दुख्खी कष्टी होऊन घराला कुलुप लावून हर्सूल पोलिस ठाण्याकडे  गेले होते.त्यावेळी आदित्य हर्सूल पोलिसांशी मनमोकळ्या गप्पा मारतांना दिसला. आदित्यला पाहिल्यावर सोमनाथ व त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले होते. हर्सूल पोलिसांनाही आदित्यला आई वडिल पुन्हा मिळाल्याचे समाधान वाटले.बनकर दांपत्याने पोलिस निरीक्षक इंगोले यांचे आभार मानले

आपलं सरकार

Click to listen highlighted text!