Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : निवृत्त परिवहन अधिकार्‍याची घरफोडी उघडकीस, मुद्देमाल फिर्यादीला परंत

Spread the love

औरंगाबाद – पावणे दोन वर्षानंतर एन १सिडको परिसरातील घरफोडी सिडको औद्योगिक पोलिसांनी उघडकीस आणंत दोन चोरट्यांना अटक केली व फिर्यादीला चोरी गेलेला मुद्देमाल परंत केला. निवृत्त परिवहन अधिकारी मधुकर बापूसाहेब जाधव यांचे एन १ सिडको परिसरात घर आहे. पण एप्रिल २०१९ मध्ये  ते ठाणे येथे राहण्यासाठी गेले असता चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून एक रिव्हाॅल्व्हर आणि ९० हजाराचे दांगिने चोरट्यांनी खिडकीचे गज कापून लंपास केले होते .

या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या घरफोडीचा तपास करंत पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी पूर्ण केला.संतोष उर्फ बांग्या रामफळे (२२) रा.चिकलठाणा व प्रशांत ठोंबरे (२६) रा.एकतानगर यांना अटक केली. या प्रकरणात चोरट्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने पोलिस निरीक्षक पोटे यांनी मुद्देमाल फिर्यादीला परंत दिला.वरील कारवाई पीएसआय कैलास अन्नलदास, सुरेश जारवाल, कल्याण मुगदल यांनी पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!