Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaWorldUpdate : चिंताजनक : अमेरिकेची स्थिती अधिक गंभीर , २४ तासात होताहेत २ हजारहून अधिक मृत्यू

Spread the love

जगभरात कोरोनाचा कहर चालूच असून अमेरिकेतील परिस्थितीही पुन्हा एकदा चिंताजनक होताना दिसत आहे. तब्बल सहा महिन्यानंतर अमेरिकेत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली असून, प्रत्येक ४० सेंकदाला एका व्यक्तीला जीव गमावावा लागला आहे. गेल्या २४ तासात अमेरिकेत २ हजार १५७ रुग्णांचा करोना संसर्गामुळे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.

दरम्यान कोरोनाची रुग्णसंख्या अचानक वाढल्यानं अमेरिकेतील रुग्णालयांमध्ये नव्या रुग्णांसाठी बेडच शिल्लक राहिलेले नाहीत. मंगळवारी अमेरिकेत १ लाख ७० नवीन रुग्ण आढळून आले. हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोरोना उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत अमेरिकेत २ लाख ६० हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १२.६ मिलियन नागरिक करोनाबाधित झाले आहेत. मंगळवारी मृत्यूच्या संख्येत झालेली वाढ सहा महिन्यानंतरची सर्वात मोठी वाढ आहे. एप्रिलमध्ये अमेरिकेत २४ तासांत ३ हजार ३८४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!