Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : खोदा पहाड , निकला चुहा : योगी सरकारच्या लव्ह जिहाद च्या चौकशीत काहीही आढळले नाही

Spread the love

भाजप शासित राज्यात लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात सातत्याने केवळ वक्तव्यच केले  जात नसून त्यासाठी कायदा करणे , अशा घटनांच्या चौकशा करणे , त्याविषयी चर्चा करणे असे उद्योग केले जात आहेत. दरम्यान  उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारने लव्ह जिहाद प्रकरणाचा तपास करण्यासाठी सरकारनं नेमलेल्या एसआयटीच्या तपासात कोणतेही पुरावे आढळले नसल्याने सरकारची अवस्था ” डोंगर पोखरून उंदीर काढला ” अशी झाली आहे. “या घटनांमागे षडयंत्र असल्याचं कुठेही आढळून आलेलं नाही. तपास करणाऱ्या पथकाला या आरोपींच्या मागे कोणतीही संघटना असल्याचे पुरावे मिळाले नाहीत. त्याचबरोबर त्यांना परदेशातून पैसा पुरवल्याचंही आढळून आलेलं नाही,”अशी माहिती पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी दिल्यामुळे सरकारची पंचाईत झाली आहे.

दरम्यान योगी सरकारनं उत्तर प्रदेशातील लव्ह जिहाद घटनांचा तपास करण्यासाठी व परदेशातून पैसा पुरवला जात असल्याच्या आरोपा तपास करण्यासाठी एसआयटी नेमली होती. एसआयटीनं लव्ह जिहाद प्रकरणाचा तपास पूर्ण केला असून, त्यात योगी सरकारची निराशा झाली. एसआयटीने केलेल्या तपासाची पोलीस महानिरीक्षक मोहित अग्रवाल यांनी माहिती दिली. “लव्ह जिहाद प्रकरणात सामूहिक स्वरूपात धर्मांतर करून लग्न केल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. त्याचबरोबर यात परदेशातून पैसा पुरवला जात असल्याचं आढळून आलेलं नाही,” असं अग्रवाल म्हणाले.

उत्तर प्रदेशात पोलीस उपअधीक्षक विकास पांडेय यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन करण्यात आली होती. १४ प्रकरणांचा तपास केल्यानंतर एसआयटीनं तपास अहवाल अग्रवाल यांच्याकडे सादर केला होता. १४ प्रकरणात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. १४ प्रकरणांपैकी ११ प्रकरणात पोलिसांनी आरोपींविरुद्ध कलम ३६३ (अपहरण), कलम ३६६ (अपहरण, स्त्रीला लग्न करण्यास भाग पाडणे) अंतर्गत कारवाई केलेली आहे. आठ प्रकरणांमध्ये मुली अल्पवयीनं असल्याचं आढळून आलं आहे, असं अग्रवाल म्हणाले. “१४ पैकी तीन प्रकरणात हिंदू मुलींनी आरोपींच्या बाजूने जबाब दिलेला आहे. त्यांनी स्वतःच्या मर्जीने मुस्लीम व्यक्तीशी विवाह केल्याचं या मुलींनी म्हटलं आहे. तीनही प्रकरणातील मुली १८ वर्षांच्या वरील आहेत. या तीन प्रकरणांमध्ये आरोपींनी मुलींना आकर्षित करण्यासाठी नावात बदल केल्याचं दिसून आलं आहे. चुकीची ओळख सांगून, तसेच बनावट कागदपत्र तयार केले आहेत. या तिन्ही प्रकरणातील आरोपींविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!