Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCrimeUpdate : मोठी बातमी : ड्रग्ज पेडलर्सकडून एनसीबी पथकावर हल्ला , तिघांना अटक, १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Spread the love

मुंबईत एनसीबीची धडाकेबाज कारवाई सुरु असताना एनसीबीचे तपास अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यात आला असल्याचे वृत्त आहे. गोरेगावमध्ये ड्रग्ज पेडलर्सकडून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. काल संध्याकाच्या सुमारास हा हल्ला झाला आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील चौकशी सुरु आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा अनेक तारे-तारकांवर कारवाई करणारे समीर वानखेडेच होते. समीर वानखेडे हे एनसीबीचे विभागीय संचालक आहेत. बॉलिवूडचं असलेलं ड्रग्ज कनेक्शन त्यांनी उघड केलं असून याच रागातून आता त्यांच्यासह त्यांच्या टीमवर हल्ला झाला असावा अशी शक्यता आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्हीही आरोपींना न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात समीर वानखेडे यांच्यासह आणखी एक कर्मचारी  जखमी झाला आहे. ही घटना काल रात्री घडली आहे. समीर वानखेडे हे कैरी मेंडिस नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. ड्रग्ज पेडलर कैरी मेंडिसला पकडताना हा हल्ला झाला. एकूण पाच लोकांची टीम या कारवाईसाठी गेली होती. कैरी मेंडिसला पकडून एनसीबी ऑफिसला आणण्यात आलं आहे. या हल्ला प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान एनसीबीने नुकतीच हास्य अभिनेत्री  भारती सिंहला ड्रग्ज प्रकरणात अटक केली होती तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर तिचा पती हर्ष लिम्बचिया याचीही कसून चौकशी केली. त्याआधी बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल आणि त्याची लिव्ह इन पार्टनर यांचीही चौकशी केली होती. ड्रग्ज प्रकरणात आधी रिया चक्रवर्तीला अटक झाली. त्यानंतर बॉलिवूडच्या अनेक लोकांची नावं समोर आली. दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान, दीपिकाची मॅनेजर, श्रुती मोदी, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर या सगळ्यांची चौकशी केली होती.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!