Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCoronaUpdate : अनियोजित लॉकडाऊनमुळे लाखो लोकांना मोदी सरकारने गरिबीत ढकलले , राहुल गांधी यांचे टीकास्त्र

Spread the love

संसदीय समितीच्या अहलावावरून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी  यांनी कोरोनाबाबत आलेल्या केंद्रातील मोदी सरकारवर  टीका केली आहे. मोदी सरकारच्या अनियोजित लॉकडाउनमुळे  लाखो लोकांना गरिबीत ढकलले. नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकले आणि डिजिटल विभाजनाच्या कारणामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी देखील तडजोड केली, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान याच अहवालाचा संदर्भ देत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  समितीचे अध्यक्ष रामगोपाल यादव यांनी हा अहवाल शनिवारी राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांना सोपवला होता. सरकारद्वारे कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी सादर करण्यात आलेला हा  पहिलाच अहवाल आहे. सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीत आपली गुंतवणूक वाढवण्याची आवश्यकता असल्याचेही समितीने म्हटले आहे.

या अहवालात म्हटले आहे कि , १.३ अब्ज इतकी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात आरोग्यावर अतिशय कमी खर्च आहे आणि भारतीय आरोग्य व्यवस्थेच्या या नाजुकपणामुळे कोरोना महासाथीचा प्रभावीपणे मुकाबला करण्यात अडचणी आल्या, असे आरोग्याशी संबंधित स्थायी संसदीय समितीने कोविड-१९ महासाथीचा प्रकोप आणि प्रबंधनाबाबतच्या अहवालात नमूद केले आहे. कोविड-१९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयांमध्ये असलेल्या खाटांची कमतरता आणि महासाथीच्या उपचारासाठी विशिष्ट दिशानिर्देशांच्या अभावामुळे खासगी रुग्णालयांनी अव्वाच्यासव्वा पैसे उकळले. या बरोबरच निश्चित किंमत प्रक्रियेद्वारे अनेक मृत्यू टाळता आले असते, असे समितीने म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!