Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : खेदजनक आणि धक्कादायक : “या” राज्यात आजही पाळली जातेय अस्पृश्यता आणि सरकारही सांभाळते आहे सवर्णांची मर्जी !!

Spread the love

कायद्याने देशातील अस्पृश्यता नष्ट झाली असली तरी कर्नाटकसारख्या राज्यात दलितांचे  केस कापले म्हणून एका न्हाव्याच्या कुटुंबावर बहिष्कार घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे . दरम्यान राज्यसरकारने अस्पृश्यतेविरोधात कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यापेक्षा नसती भानगड नको म्हणून कि काय कर्नाटक सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने जातीय भेदभाव दूर करण्यासाठी समाज  कर्नाटकमध्ये सरकारी सलून  सुरू करण्याची शिफारस केली आहे. या शिवाय केरळमध्येही  दलितांना सर्वसाधारण सलूनचा वापर करू दिले जात नसल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. यानंतर राज्य सरकारने गावात सरकारी सलून सुरू करण्यासाठी पाऊल उचललं असलं तरी तथाकथित सवर्ण लोकांची मर्जी सांभाळण्याचे काम सरकार करीत आहे हे आश्चर्यजनक आहे.

विशेष  म्हणजे कर्नाटक म्हणजे या राज्यात त्या पक्षाच्या नेत्याचे सरकार आहे ज्या नेत्याने आपल्या मतदार संघात दलित आणि महिलांचे पाय स्वच्छ केले होते. त्या नेत्याचे नाव आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आहे येडियुरिअप्पा.

मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावात देण्यात आलं आहे की, अनेक गावांमध्ये न्हावी दलितांचे केस कापणे वा दाढी करत नाही. जातीय भेदभावामुळे त्यांना या सेवेपासून वंचित ठेवलं जातं. अनेकदा दलितांचे केस कापणाऱ्या न्हाव्यावर सामाजिक बहिष्कार घातला जातो. यासाठी सर्व ग्राम पंचायतींच्या सीमांजवळ सरकारी सलूनची दुकाने सुरू करणे गरजेचं आहे. समाज कल्याण विभाग यासाठी आवश्यक निधी मंजुर करणार असल्याचे सांगितलं जात आहे. हा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्या अध्यक्षतेखाली एससी-एसटी अत्याचार अधिनियमावर  समीक्षा बैठकीदरम्यान दिलेल्या एजेंड्याचा एक भाग होता.

 म्हैसूरमधील  धक्कादायक प्रकार

दरम्यान कर्नाटकातील  म्हैसूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका न्हावीवर गावकऱ्यांनी 50000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. हैराण करणारी बाब म्हणजे त्याने अनुसूचित जाती-जमाती  समुदायाच्या लोकांचे केस कापले म्हणून त्याला हा दंड ठोठावण्यात आला. ही घटना नानजनगुगु भागातील हल्लारे गावातील आहे. व्यवसायाने न्हावी असलेले मल्लिकार्जुन शेट्टी यांनी सांगितले की, त्यांच्यावर 50000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. याशिवाय स्थानिकांनी त्याच्या कुटुंबाचा सामाजिक बहिष्कार केला आहे. मल्लिकार्जुन यांनी सांगितलं की, यापूर्वीदेखील अनेकवेळा त्यांच्यावर इतका मोठा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी दोन वेळा शेट्टी यांनी दंड भरला आहे. त्यांनी सांगितलं की, गावातील चन्ना नाइक आणि दुसरे लोक त्याला त्रास देत आहे. त्याने एससी आणि एसटी समुदायातील लोकांचे केस कापले आणि दाढी केली त्यामुळे त्याला धमकीही दिली जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!