Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची स्थिती

Spread the love

गेल्या २४ तासात महाराष्ट्रात ५५३५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ५८६० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १६ लाख ३५ हजार ९७१ रुग्ण बरे झाले असल्याचे म्हटले आहे. सध्या राज्यात ७९७३८ रुग्णांवर उपचार चालू आहेत. राज्यातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण आता ९२.७९ इतके झाले असल्याचेही  त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सलग तिसऱ्या दिवशी पाच हजारांपेक्षा जास्त रुग्ण करोना पॉझिटिव्ह झाले आहेत. १७ नोव्हेंबरपर्यंत ही संख्या २ ते ३ हजारांच्या घरांमध्ये होती. आता सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ५ हजार ६४० नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर  महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये १५५ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर हा २.६३ टक्के इतका आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आज पर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ९० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ४ हजार ८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात आज घडीला ७८ हजार २७२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात ५ हजार ६४० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना रुग्णांची एकूण संख्या १७ लाख ६८ हजार ६९५ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या १५५ मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १३ मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत. उर्वरित ९१ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!