Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : कोरोनामुळे यावर्षीचा महापरिर्वन दिन ऑनलाईन , चैत्यभमीवर गर्दी न करण्याचे आवाहन

Spread the love

कोरोनामुळे या वर्षी राज्यात कुठलेही धार्मिक, सार्वजनिक उत्सव झाले नाही.  याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक नियमाचे पालन करीत बौद्ध धम्म आणि डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी  यंदाच्या ६  डिसेंबरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महपरिनिर्वाण दिनी मुंबईत चैत्यभूमीवर  गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. या दिवशी राज्य आणि देशभरातील जनतेला चैत्यभूमीला अभिवादन करता यावे म्हणून राज्य सरकारने यावेळी आयोजित मुख्य सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे .

अशोक विजयादशमीला नागपूर येथी दीक्षाभूमीवर आणि ६ डिसेंबरला मुंबईच्या चैत्यभूमीवर दरवर्षी लाखो आंबेडकर अनुयायी एकत्र येऊन डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात परंतु या वर्षी दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळाही होऊ शकला नाही. राज्यातील कोरोनाची स्थिती  लक्षात घेऊन यावर्षी चैत्यभूमीवर अनुयायांनी येऊ नये असं सरकारचं आवाहन आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज चैत्यभूमीची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

चैत्यभूमी च्या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रक्षेपण

या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे म्हणाले कि , चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे राज्यातील प्रमुख वाहिन्यांसोबतच सरकारी वाहिन्या तसेच विविध माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. विशेष म्हणजे हे लाईव्ह आणि त्यासाठीचे तंत्रज्ञान राम मंदिराच्या पायाभरणी दरम्यान वापरण्यात आले होते त्या पद्धतीचे तंत्रज्ञान वापरून चैत्यभूमी येथील कार्यक्रम लाईव्ह दाखवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे राज्यातील आणि देशातील प्रत्येक आंबेडकरी अनुयायांना आपल्या घरीच हा कार्यक्रम पाहता येईल अशी सोय करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका खर्च करणार असली तरी आवश्यकता पडल्यास सामाजिक न्याय विभागसुद्धा यासाठीचा निधी उपलब्ध करून देईल असेही मुंडे यांनी म्हटले आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी येथे सुरु असलेल्या तयारीच्या नियोजनाचा तसेच इंदू मिल येथे उभे राहत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मार्च २०२३मध्येच पूर्ण केले जाईल आणि त्याचा लोकार्पण सोहळा १४ एप्रिल २०२३ रोजी केला जाईल, यासाठीची तयारी सुरू असल्याची माहितीही  मुंडे यांनी दिली. आंबेडकर स्मारकाच्या दोन्ही तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून मुख्य प्रवेशद्वार आमच्या सूचनेनंतर ते साडेसहा फुटावर नेण्यात आले आहे. इतर कामे ही वेगात असल्याची माहितीही मुंडे यांनी यावेळी दिली. स्मारक बांधकामाच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय खात्याकडे असून, या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी विभागामार्फत एका सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येत असल्याचे यावेळी मुंडे यांनी सांगितले.

मुंडे यांनी आंबेडकर स्मारक समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. स्मारकाच्या बांधकामासंदर्भात कोणती तयारी सुरू आहे याचाही एम एम आर डी ए, सामाजिक न्यायचे अधिकारी, काम करणारी कंपनी यांच्या समवेत बैठक घेऊन आढावा घेत हे सर्व काम दोन महिने अगोदर म्हणजेच मार्च २०२३ पूर्वी झाले पाहिजे अशा सूचनाही त्यांनी दिल्या

आपलं सरकार

Click to listen highlighted text!