IndiaPoliticalUpdate : ” वोट कटवा ” शिक्का पुसण्यासाठी एमआयएमचा ममतांसमोर युतीचा प्रस्ताव

Spread the love

तेलंगाणा , आंध्र प्रदेश , महाराष्ट्राच्या नंतर बिहारमध्ये प्रवेश केल्यानंतर ” वोट कटवा ” अशी टीका झेलणाऱ्या  ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एएमआयएम पक्षाचे नेते खा. असदुद्दीन ओवैसी यांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर युतीचा प्रस्ताव दिला आहे. आगामी निवडणुकीत भाजपला हरवण्यासाठी तृणमूल काँग्रेसला मदत करण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपूर्वीच महाआघाडीचा प्रस्ताव असदुद्दीन ओवैसी यांनी ममता बॅनर्जींसमोर थवा असल्याचे वृत्त आहे.

दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एआयएमआयएम आणि अदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका करताना राज्यातील जनतेला ‘बाहेरच्यांना’ विरोध करण्याचं आवाहन केलं होतं. बिहार निवडणुकीनंतर ‘वोटकटवा’ आणि ‘भाजपची बी टीम’ म्हणत काँग्रेसनंही एआयएमआयएमवर निशाणा साधला होता. तसंच तृणमूल खासदार सौगता रॉय यांनीही, भगव्या पक्षानं (भाजप) तृणमूलची मतं विभागण्याचं काम एआयएमआयएमला दिल्याची टीका केली होती. मुस्लीम मतांची विभागणी आणि धर्मनिरपेक्ष पक्षांना नुकसान हे एकमेव एआयएमआयएमचं उद्दीष्ट असल्याची टीका या पक्षांकडून करण्यात आली होती.

आपल्यावर होत  असलेल्या टीकेला उत्तर देताना पश्चिम बंगालमध्ये भाजपला हरवण्यासाठी आपण ममता बॅनर्जींना मदत करण्यासाठी तयार असल्याचं असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर केलं आहे. बिहारच्या सीमांचल भागात पाच विधानसभा जागांवर ताबा मिळवल्यानंतर एआयएमआयएचा आत्मविश्वास वाढला आहे.  त्यामुळे बिहारचे निकाल लागताच  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतही  आपण आपले उमेदवारउभे करणार असल्याचे म्हटले आहे.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.