Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कोरोनानेही घेतला शाळांमध्ये प्रवेश , ८ शिक्षकांसह १३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा

Spread the love

मार्च महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा केंद्र सरकारच्या परवानगीनंतर हळूहळू शाळा उघडण्यास सुरवात झाली आहे.  परंतु यंदा विद्यार्थ्यांबरोबर कोरोनाही शाळेत प्रवेश करीत असल्याचे वृत्त येत आहे.  हरयाणा राज्यातील  रेवाडीच्या १२ शाळांमध्ये  करण्यात आलेल्या तपासणीत  ७२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.  याशिवाय  मंगळवारी जींदमध्ये  ८ शिक्षक आणि ११ शालेय मुलांसह ६६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचंही  समोर आलं आहे.

दरम्यान महाराष्ट्रातही लवकरच शाळा सुरु होत असून कोरोनाविषयक नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. शाळेतील केवळ शिक्षकांची कोरोनाविषयक चाचणी करण्याशिवाय सुरक्षेची सर्व जबाबदारी शासनाने शाळेच्या व्यवस्थापनावर टाकली आहे. त्यामुळे राज्यातील संस्थाचालक चिंतीत झाले आहेत.

विशेष म्हणजे सणांमुळे नागरिकांचं फिरणं वाढलं आहे. यामुळेच आम्ही १२ शाळांमधील ८३७ विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यात ७२ मुलं करोना पॉझिटिव्ह आढळून आले, असं नोडल अधिकारी विजय प्रकाश यांनी सांगितलं. ज्या शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्या शाळा दोन आठवड्यांसाठी बंद करण्यात आल्या  असून मास्कचा  वापर आणि सोशल डिस्टन्सिंग आवश्यक केलं आहे.  मात्र कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण यंत्रणा बंद करता येणार नाही, असे  हरयाणाचे शिक्षणमंत्री कंवरपाल गुर्जर यांनी   म्हटले आहे.

दरम्यान ‘आम्ही सर्व सिव्हिल सर्जनना करोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या असून जबाबदार अधिकाऱ्यांना शाळांची तपासणी करण्यास सांगितलं गेलं आहे. शाळांसाठी देण्यात आलेल्या कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचं पालन होतंय का? हे शासकीय यंत्रणा पाहत असून  जिथे नियमांकडे दुर्लक्ष केलं जाईल किंवा नियमांचं पालन होणार नाही, तिथे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!