Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharNewsUpdate : नितीशबाबूंच्या मंत्रिमंडळातील वादग्रस्त शिक्षण मंत्र्यांची अखेर गच्छंती , आजच स्वीकारला पदभार आणि आजच दिला राजीनामा !!

Spread the love

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नवनियुक्त सरकारमधील बिहारचे नवे शिक्षणमंत्री मेवालालाल चौधरी यांनी आपल्या पदाची राजीनामा दिला आहे. आजच त्यांनी शिक्षणमंत्री पदाचा पदभार स्वीकारला होता. मेवालाल यांच्यावर कृषी विद्यापीठात कुलगुरू असताना झालेल्या नियुक्तीतील घोटाळ्याचा आरोप आहे. माजी आयपीएस अधिकारी अमिताभ दास यांचा आरोप आहे की, मेवालाल यांची पत्नी माजी आमदार नीता चौधरी यांचा मागील वर्षी झालेल्या संशयास्पद मृत्यूचे धागेदोरे या नियुक्ती घोटाळ्याशी संबंधित असू शकतात. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अमिताभ दास यांनी पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिले आहे.

जानेवारी २०१६ मध्ये हा घोटाळा उघडकीस आणला होता. मेवालाल भागलपूर कृषी विद्यापीठात कुलगुरु असताना२०१२ मध्ये कृषी वैज्ञानिक, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती होणार होती. २८१ पदांसाठी जाहिराती निघाली होती, परीक्षेनंतर १६६ जणांची नेमणूक करण्यात आली. यानंतर घोटाळ्याचे आरोप झाले आणि ज्याला कमी मार्क मिळाले उमेदवार उत्तीर्ण झाले. तर ज्याला जास्त मार्क मिळाला तो नापास झाले, असा हा घोटाळा होता.

दरम्यान मेवालाल यांनी राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षाने पुन्हा एकदा नितीश सरकारवर हल्लाबोल केला आहे. राजद नेते नवल किशोर सिंह यांनी सरकारवर टीका करताना म्हटले आहे कि , नितीशकुमार हे रबर स्टॅम्प मुख्यमंत्री झाले आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील पक्ष असूनही त्यांना मुख्यमंत्री केले गेले आहे. भाजप भ्रष्टाचाऱ्यांची सोबत करत आहे. बिहार सरकारमधील मंत्र्यांच्या विशेषता काय आहेत या विषयी कालच महानायक ऑनलाईनने विशेष वृत्त दिले होते. त्यापैकी शैक्षणिक घोटाळ्याचा आरोप असलेले शिक्षणमंत्री मंत्रिपदावरून पायउतार झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!