Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : प्रियकराच्या आईने धंद्याला लावण्याची धमकी दिल्याने प्रेयसीची आत्महत्या

Spread the love

औरंगाबाद- मातंग समाजाच्या मुलावर प्रेम करणार्‍या  मुलीला मुलाच्या आईने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडीन अशी धमकी दिल्यामुळे दलित तरुणीने गळफास घेतला असल्याचे  वृत्त आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्ला दाखल झाला आहे. प्रेम विनोद खेत्रे व त्याची आई अनिता खेत्रे अशी फरार आरोपींची नावे आहेत. नमिता इंगोले असे मयत तरुणीचे नाव असून तिचे आरोपी प्रेम खेत्रे वर दोन वर्षांपासून  प्रेम होते. हा प्रकार जेंव्हा प्रेमची आई अनिता खेत्रे हिला समजला तेंव्हा तिने मुलीला ,  “माझ्या मुलावर प्रेम केल्यास तुला धंद्याला लावीन ”  अशी धमकी दिल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले . या बाबत आत्महत्येस  प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल होताच प्रियकर प्रेम आणि त्याची आई अनिता  फरार झाले आहेत.  पोलिस निरीक्षक डाॅ.गणपत दराडे यांच्या मार्गदर्शमाखाली पीएसआय गजानन सोनटक्के या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Click to listen highlighted text!