Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiCrimeUpdate : भयानकच !! प्रेयसीवर चाकू हल्ला करून “त्याने” तोंडात फोडला सुतळी बॉम्ब ….

Spread the love

मुंबईच्या मालाड मध्ये आधी आपल्या ५८ वर्षीय प्रेयसीवर चाकूहल्ला करून तिला मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर तोंडात सुतळी बॉम्ब फोडून एका ५५ वर्षीय व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला.  प्रियकर आणि प्रेयसी दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कुपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुरार पोलिसांनी या प्रकरणात ५५ वर्षीय व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी महिला मालाड पूर्वेला पुषपार्क भागामध्ये राहते. या महिलेला दोन मुली आणि एक मुलगा आहे. ते आपल्या आजी-आजोबांकडे राहतात. जखमी महिला अंधेरीतील एका सोसायटीमध्ये जेवण बनवायचे काम करते. महिलेचे आरोपी ड्रायव्हरसोबत मागच्या १५ वर्षापासून प्रेमसंबंध होते. आरोपी ड्रायव्हर अनेकदा महिलेच्या घरी जायचा. त्यांच्या या प्रेमसंबंधांना महिलेच्या आईचा विरोध होता. त्यावरुन महिला आणि तिच्या प्रियकरामध्ये नेहमी भांडणे व्हायची. रविवारी सकाळी सात वाजता दोघांमध्ये पुन्हा भांडण झाले .

सदर महिला कामावर जाण्यासाठी घरातून निघण्याची तयारी करत होती. त्यावेळी आरोपीने तिच्याकडे आपले कपडे मागितले. त्यावरुन दोघांमध्ये वादावादी सुरु झाली. संतापाच्या भरात आरोपीने त्याच्या जवळचा चाकू काढला व महिलेचा गळा चिरला. महिला खाली कोसळल्यानंतर त्याने सुतळी बॉम्ब पेटवून स्वत:च्या तोंडात ठेवला. या दोघांचीही प्रकृती गंभीर आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!