Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathawadaNewsUpdate : जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले भाजप सोडण्याचे कारण , सतीश चव्हाण यांचे बळ वाढले

Spread the love

भाजपचे  जेष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपचा त्याग करताच ‘भारतीय जनता पक्षानं मला अनेक डागण्या दिल्या आहेत. आता मला भाजपला पाडायचं आहे,’ अशा शब्दांत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. ऐन पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी हा निर्णय घेत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

‘पक्षात सन्मानाची वागणूक मिळत नाही. वारंवार पक्ष नेतृत्वाला संपर्क करूनही गेल्या  १३ वर्षांपासून पक्षाने मला कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही. पक्षात मागूनही काम मिळत नाही,’ अशी व्यथा मांडत त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली. तीन वेळा खासदार, दोन वेळा पदवीधर मतदारसंघाचे आमदार, राज्य सरकार व केंद्रात राज्यमंत्री पद भूषविलेल्या गायकवाड यांचा राजकीय  आहे.

लोकसभा , विधानसभेच्या वेळी त्यांनी आपल्याला संधी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्न केले परंतु पक्षाने त्यांना इतके महत्व दिले नाही म्हणून ते नाराज होते . मराठवाड्यात त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे. संघात वाढलेले जयसिंगराव भाजपचे जनसंघापासूनचे जुने कार्यकर्ते होते. निदान मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत तरी पक्ष आपणास संधी देईल या आशेवर त्यांनी  उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, भाजपकडून तिकीट मिळाले नसल्याने त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेऊन आपला  अर्ज मागे घेत त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजप सोडल्यानंतर गायकवाड पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलं असता ते म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत आताच काही सांगणार नाही. आता मला भाजपला पाडायचं आहे. उद्यापासून सतीश चव्हाण यांच्या प्रचारासाठी मराठवाडा दौरा सुरू करणार आहे.’

आपलं सरकार

Click to listen highlighted text!