Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCrimeUpdate : क्रौर्याची परिसीमा : सात वर्षाच्या चिमुरडीवर बलात्काराचा प्रयत्न करून खून , मूल होत नाही म्हणून खालले यकृत !!

Spread the love

गुन्ह्यांच्या विश्वात कधी कुठे काय भयानक घटना घडेल सांगता येत नाही . उत्तर प्रदेशात अशीच एक भयंकर गुन्हा उघडकीस आला आहे.  या घटनेत सात वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह सापडला असून तिचे यकृत बाहेर काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. खुनाच्या आधी या मुलीवर बलात्कार झाल्याचाही संशय असल्याची माहितीही  पोलिसांनी दिली आहे. मुलाच्या हव्यासापोटी गावातील एका दांपत्याने मुलीच्या हत्येचा कट रचला होता. यासाठी त्यांनी मुलीच्या शेजारी राहणाऱ्या दोघांना एक हजार रुपये दिले होते अशी माहिती  मिळाली आहे.

या विषयी पोलिसांनी सांगितले कि , शनिवारी रात्री दोघांनी मुलीचं अपहरण केलं. दारुच्या नशेत असणाऱ्या या दोघांनीही मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर तिची हत्या केली. धक्कादायक म्हणजे मुलीची हत्या केल्यानंतर त्यांनी तिचं यकृत बाहेर काढलं आणि विधी करण्यासाठी दांपत्याकडे सोपवलं असंही पोलिसांनी सांगितलं आहे. रविवारी सकाळी मुलीचा मृतदेह गावात सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शरिरातील इतर अवयवही बाहेर काढण्यात आले असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सर्व चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, “दोन्ही आरोपींनी मुलीसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिचं यकृत बाहेर काढलं आणि परशुराम यांच्याकडे नेऊन सोपवलं”. परशुरामचं १९९९ मध्ये लग्न झालं असून मूल नसल्याने त्याला नैराश्य आलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय पीडितेच्या कुटुंबाला पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अनेक टीम तयार करण्यात आल्या होत्या. संशयाच्या आधारे मुलीचे शेजारी अंकुल आणि बीरन यांना ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान त्यांनी कबुली दिली. अंकुरचे काका परशुराम यांनी आम्हाला पैसे दिले होते अशी माहिती त्यांनी दिली, असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!