Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCrimeUpdate : कोरोनाबाधित महिलेवर रुग्णालय कर्मचाऱ्याकडून बलात्काराचा प्रयत्न , आंदोलनानंतर आरोपी झाला गजाआड

Spread the love

देशभरात बलात्काराच्या अनेक घटना घडूनही अनेक नराधम संधी शोधून महिलांवर अत्याचार करीतच आहेत. केरळच्या मधील  उल्लियरीमधील मालाबार मेडिकल कॉलेजमध्ये  उपचारार्थ दाखल  करण्यात आलेल्या कोरोनाबाधित २० वर्षीय तरुणीवर  बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या  आरोपीला अठोली पोलिसांनी  बेड्या ठोकल्या आहेत. विशेष म्हणजे हा आरोपी याच रुग्णालयाचा कर्मचारी आहे . महाराष्ट्रासह इतर राज्यातही अशी प्रकरणे घडली आहेत. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करूनही या घटना थांबताना दिसत नाहीत. या आधीही केरळमध्येच रुग्णालय चालकाने कोरोबाधित तरुणीवर बलात्कार केल्याची घटना सप्टेंबरमध्ये घडली होती.

या घटनेविषयी बोलताना पोलिसांनी सांगितले कि , आरोपीचे नाव अश्विन कृष्णा वय ३४ असे  असे असून  तो चेलानूरचा रहिवासी आहे. अश्विन कृष्णावर विविध कलमांखाली कारवाई करण्यात येऊन त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने आरोपी अश्विन कृष्णाला निलंबित केले आहे. अश्विन हा रुग्णालयातील खरेदी विभागात काम करत होता. त्याला नर्सिंग कॉलेजच्या इमारतीत सुरू असलेल्या कोविड रुग्णालयात तैनात करण्यात आले होते, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

सदर महिलेला गुरुवारी संध्याकाळी या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तिच्या आई-वडिलांना देखील करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या सर्वांना याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पीडित महिलेने सांगितले कि , रुग्णालयाच्या रेकॉर्डसाठी म्हणून आरोपीने प्रथम तिचा फोन नंबर घेतला. त्यानंतर आरोपी अश्विन या महिलेला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवू लागला. पुढे तो तिला फोनही करू लागला सुरुवातीला याकडे महिलेने दुर्लक्ष केले. दरम्यान रविवारी रात्री सुमारे १० वाजून ४० मिनिटांच्या सुमारास त्याने डॉक्टर बोलावत असल्याचे महिलेला सांगितले, आणि आरोपीने पीडित महिलेला चौथ्या मजल्यावर नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. पीडित महिला आरडाओरड करत तेथून पळाली आणि तळमजल्यावर येऊन तिने आपल्या आई-वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. हे प्रकरण सार्वजनिक झाल्यानंतर राजकीय पक्षांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने सुरू केली. प्रकरण महिला आयोगापर्यंत पोहोचले. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे निर्देश महिला आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आणि त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!