Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathwadaNewsUpdate : मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे चित्र आज स्पष्ट होणार , सतीश चव्हाण यांचा झंझावाती प्रचार दौरा

Advertisements
Advertisements
Spread the love

मराठवाडा पदवीधर निवडणुकीत ४५ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असले तरी उद्या १७ तारीख उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे . विशेष म्हणजे छाननीत ज्या ८ उमेदवारांचे अर्ज बाद झाले त्यात भाजपचे बंडखोर उमेदवार प्रवीण घुगे यांचाही अर्ज बाद झाला .  १७ तारखेनंतर प्रत्यक्ष मैदानातील उमेदवार निश्चित होणार असले तरी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यात खरी लढत राहील असे चित्र आहे . दरम्यान शिरीष बोराळकर आणि सतीश चव्हाण यांनी आपला झंझावाती प्रचार सुरु केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण उद्या दिवसभरात आपल्या प्रचार दौऱ्यात जालना शहरातील मतदारांना भेटणार आहेत.

Advertisements

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र इंग्लिश स्कूल असोसिएशन (मेसा) ने सतीश चव्हाण यांना प्रत्यक्ष भेटून जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे-हस्तेकर, उपाध्यक्ष हनुमान भोंडवे, उपाध्यक्ष नागेश जोशी, सचिव प्रवीण जी अव्हाळे, मनोज पाटील, मोहन हाडे पाटील, रत्नाकर फलके, विश्वासराव दाभाडे, पोपट खिरणार, वसुधा पाटील, तुकाराम मुंढे, भगवान पवार, सुनील मगर, संजय कुलकर्णी, उमेश अहिरराव, लक्ष्मण पल्हाळ यांची उपस्थिती होती.

Advertisements
Advertisements

याशिवाय  महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेच्या महामंडळाने आणि  अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेनेही सतीश चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये  संघटनेचे अध्यक्ष वाल्मिक सुरासे, कार्याध्यक्ष केशव पाटील, सरकार्यवाह देवेंद्र चंद्रात्रे, उपाध्यक्ष पांडुरंग देडे, औरंगाबाद विभागीय कार्यवाह अशोक जिरेकर, लातूर विभागीय कार्यवाह अनिल दरेकर यांनी आज भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र दिले. तर अखिल भारतीय समाजवादी शिक्षण सभेचे उपाध्यक्ष अजमल खान, अ‍ॅड. आसाराम लहाने पाटील, प्रा. अशोक तांबटकर, प्रा. विष्णू गाडेकर, यशवंत रत्नाकर लांडगे, प्रा. सय्यद नाजीरुद्दीन, प्रा. अल्ताब हुसेन काद्री, संदीप भदाणे, प्रा. शेख सादिक संजय ढोकने पाटील, मोहम्मद बाकीर काद्री, भाऊसाहेब जाधव, कुरेशी फैजल आदी मान्यवरांनी सतीश चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!