Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : दिलासादायक : राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली

Spread the love

गेल्या २४ तासात  राज्यात ३ हजार १ जण कोरोनामुक्त झाले असून  २ हजार ५३५ नवे कोरोनाबाधित आढळले. याशिवाय ६० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४९ टक्के आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण १७, ४९,७७७ झाली आहे.

राज्यात सध्या  ८४ हजार ३८६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १६ लाख १८ हजार ३८० रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केलेली आहे. याशिवाय, करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ४६ हजार ३४ आहे. सध्या राज्यात ७ लाख ४८ हजार २२६ जण गृह विलगीकरमात आहेत. ५ हजार ३९५ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

जगभरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे बोलले जात असताना, भारतातील परिस्थिती काहीसी दिलासादायक दिसत आहे. सध्या भारतात सध्या १० लाख लोकसंख्येमागे सर्वात कमी ६ हजार ३८७ रुग्ण आहेत. तर त्यातही दिलासादायक बाब म्हणजे १५ राज्य व केंद्रशासीत प्रदेश असे आहेत, जिथं देशाच्या सरासरीपेक्षा कमी रुग्ण आहेत.

Click to listen highlighted text!