Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharPoliticalNews : नितीशकुमार सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान , सोबत या दोन मंत्र्यांनी घेतली शपथ

Spread the love

नितीश कुमार यांनी आज सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर सलग चौथ्यांदा ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. पाटण्यातील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपाचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नितीशकुमार यांच्यासोबत भाजपाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्याचबरोबर  जेडीयू नेते विजय कुमार चौधरी, विजेंद्र प्रसाद यादव, अशोक चौधरी आणि मेवालाल चौधरी यांनी तर हिंदुस्तान आवाम मोर्चाचे प्रमुख जितनराम मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन आणि विकासशील इन्सान पार्टीचे मुकेश साहनी यांनी बिहारच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.

या शपथविधी सोहळ्यावर राजदसहित महाआघाडीच्या नेत्यांनी बहिष्कार घातला आहे. भाजपने १५ जागांवर खोटेपणाने विजय मिळविला असल्याची टीका राजाज्ञे घेतली असून त्यासाठी त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. जबरीने सत्ता हस्तगत करून भाजपने बिहारी जनतेवर बलात्कार केला असून नितीशकुमार हे त्यांचे आपत्य असल्याची टीका करण्यात आली आहे.

दरम्यान नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या  शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घालणारे राजद नेते तेजस्वी यादव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री ‘नामनिर्देशित’ झाल्याबद्दल शुभेच्छा. असं तेजस्वी यादव म्हणाले आहेत.

आपल्या ट्विटमध्ये तेजस्वी यादव यांनी म्हटले होते कि , ”अपेक्षा करतो की खुर्चीच्या महत्वकांक्षे ऐवजी ते बिहारची जनकांक्षा व एनडीएच्या १९ लाख नोकऱ्या-रोजगार आणि शिक्षण, औषधी, उत्पन्न, सिंचन, सुनावणी सारख्या सकारात्मक मुद्दांना सरकारची प्राथमिकता बनवतील.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!