Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : पाकिस्तानच्या कुरापती चालूच , सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन , ८ पाकिस्तानी जवान ठार तर भारताचे तीन जवान शाहिद

Spread the love

पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमध्ये शस्त्रंसंधीचं उल्लंघन करण्यात आलं असून भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत, तर तीन जवान जखमी झाले आहेत. याशिवाय तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. गुरेज ते उरी सेक्टरदरम्यान हा गोळीबार केला जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं असून पाकिस्तानचे सात ते आठ सैनिक ठार केले असल्याचं वृत्त एएनआयने भारतीय लष्कराच्या सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. याशिवाय भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्कराचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त करत मोठं नुकसान केलं असल्याचं वृत्त आहे.


या वृत्तात म्हटले आहे कि , पाकिस्तानकडून केरन, उरी, नौगाम सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं. पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यावेळी नागरी वस्ती असलेल्या ठिकाणांना पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे. यामध्ये भारताचे तीन जवान शहीद झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान भारताने पाकिस्तानला चोख उत्तर देत त्यांचे सात ते आठ सैनिक ठार केले आहेत. याशिवाय त्यांचे बंकर्स, लाँच पॅड्स उद्ध्वस्त करत मोठं नुकसान केलं आहे. अनेक दहशतवादी तळांनाही यावेळी भारतीय लष्कराकडून टार्गेट करण्यात आलं. दरम्यान स्थानिकांध्ये भीतीचं वातावरण असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

याआधी जम्मू काश्मीरमधील कुपवारामध्य्ये इंटरनेट सेवा ठप्प करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतीय लष्कराने केरन सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न उधळून लावल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनात सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) उपनिरीक्षक शहीद झाले आहेत. राकेश डोवल असं अधिकाऱ्याचं नाव आहे. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबारात ते जखमी झाले होते. त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारादरम्यान ते शहीद झाले. याशिवाय एक जवान कॉन्स्टेबर वासू राजा जखमी आहे. त्याचा हात आणि तोंड जखमी आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

“कर्तव्य बजावताना अधिकाऱ्याने सर्वोच्च बलिदान दिलं आहे. अधिकारी मूळचे उत्तराखंडचे रहिवासी होते,” अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान अद्यापही शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात असून बीएसएफ त्यांना योग्य उत्तर देत असल्याची माहिती बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. भारतीय लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानचे कमीतकमी १० ते १२ सैनिक जखमी झाले आहेत. या बरोबरच भारताच्या या कारवाईत पाकिस्तानी बंकर ईंधन डंप आणि लॉन्च पॅड नष्ट झाले आहे.

उरी सेक्टरमध्ये नंबाला येथे भारताचे तीन जवान शहीद झाले. हाजी पीर सेक्टरमध्ये एका बीएसएफ इन्स्पेक्टरने देखील जीव गमावला.बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्येच कामलकोटे येथे तीन नागरिक ठार झाले आहेत. यांपैकी एक महिला हाजी पीर सेक्टरच्या बालकोटे येथे मारली गेली. पाकिस्तानच्या या गोळीबारामध्ये अनेक नागरिक जखमी झाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!