MaharashtraCoronaUpdate : गेल्या २४ तासात आढळले ४ हजार १३२ नवीन रुग्ण

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या २४  तासात राज्यात आज ४ हजार १३२ नवीन करोनाबाधित आढळले असून दिवसभरात ४ हजार ५४३ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण १६ लाख ९ हजार ६०७ रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२.४८ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत ९७ लाख २२ हजार ९६१ जणांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या असून त्यातील १७ लाख ४० हजार ४६१ (१७.९ टक्के) चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या ८४ हजार ८२ रुग्ण अॅक्टिव्ह रुग्ण असून या रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दुसरीकडे ८ लाख १९ हजार २६७ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ६ हजार १७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Advertisements

दरम्यान राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून २४ तासांत ४ हजार १३२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ४ हजार ५४३ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दिवाळीची धामधूम सुरू झाली असताना व बाजारांमध्ये गर्दी दिसत असतानाच रुग्ण बरे होण्याचा दैनंदिन आकडा कमी झाल्याने काहीशी चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८४ हजारपर्यंत खाली आली आहे.

Advertisements
Advertisements

राज्यातील कोरोना मृत्यूदर अजूनही अधिक आहे. राज्यात आज करोनामुळे १२७ जणांचा मृत्यू झाला असून सध्या २.६३ टक्के इतका मृत्यूदर आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूदरात काहीच घट दिसत नसल्याने ती फार मोठी चिंतेची बाब ठरली आहे. राज्यात आज सर्वाधिक १९ करोनामृत्यू वसई-विरार महापालिका हद्दीत नोंदवले गेले. त्यानंतर मुंबई पालिका हद्दीत १७ रुग्णांचा मृत्यू झाला तर सातारा जिल्ह्यात १३ जणांचा मृत्यू झाला. पुणे शहरात मृत्यूचे प्रमाण कमी झाले असून आज ७ रुग्ण दगावले आहेत. राज्यात करोनामुळे आतापर्यंत ४५ हजार ८०९ जणांना प्राणास मुकावे लागले आहे. त्यात सर्वाधिक १० हजार ५४२ मृत्यू मुंबई पालिका हद्दीत झाले आहेत.

आपलं सरकार