IndiaNewsUpdate : Sadnews : सीमेवरील धुमश्चक्रीत महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण तर पाकिस्तानचे ११ सैनिक ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

भारत पाक सीमेवर  नियंत्रण रेषेवर ऐन दिवाळीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत पाकिस्तानने काश्मीर येथे केलेल्या गोळीबारात  शहीद झालेल्या तीन जवानांपैकी दोन जवान महाराष्ट्रातील असल्याचे ह्रदयद्रावक वृत्त आहे.  या धुमश्चक्रीत वीरमरण आलेले हे जवान कोल्हापूर आणि नागपूर येथील आहेत. दरम्यान एएनआयने दिलेल्या ताज्या माहितीनुसार पाकिस्तानचे ११ सैनिक ठार झाले आहेत.

Advertisements

भारत पाक नियंत्रण रेषेला लागून असलेल्या डावर, केरन, उरी, नौगाम या भागांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. पाक सैन्याच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून सीमा सुरक्षा दलातील उपनिरीक्षक, दोन जवान या धुमश्चक्रीत शहीद झाले आहेत तर सहा नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. श्रीनगर येथील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या जवानांमधील दोन जवान महाराष्ट्रातील आहेत. नागपूर येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील ऋषिकेश रामचंद्र जोंधळे या दोन जवानांना पाक सैन्याशी लढतान वीरमरण आले आहे.

Advertisements
Advertisements

अधिक दुःखद वृत्त म्हणजे वीरमरण आलेले ऋषिकेश अवघ्या २० वर्षांचा होते. कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी हे त्याचे गाव असून ऋषिकेशच्या निधनाची बातमी गावात येताच संपूर्ण बहिरेवाडी पंचक्रोशीवर ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे. ऋषिकेश  ६ मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होते. ११ जून रोजी त्यांनी  ड्युटी जॉइन केली होती. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्या माध्यमातून त्याची भारतीय लष्करात भरती झाली होती. त्यांना  एक लहान बहीण आहे. दरम्यान, ऋषिकेशचे पार्थिव उद्या रात्रीपर्यंत गावात पोहचेल असे सांगण्यात आले आहे.या दोन्हीही वीर जवानांना महानायकची भावपूर्ण आदरांजली.

आपलं सरकार