CoronaMaharashtraUpdate : गेल्या २४ तासात  राज्यात आढळले ४ हजार ४९६ नवीन रुग्ण

Advertisements
Advertisements
Spread the love

गेल्या २४ तासात  राज्यात ४ हजार ४९६ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा १७ लाख ३६ हजार ३२९ इतका झाला आहे. दरम्यान आज राज्यात १२२ करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळं सध्या राज्यातील मृत्यूदर २. ६३ टक्के इतका झाला आहे. तर, आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३ लाख ६४ हजार २७५ चाचण्यांपैकी १७ लाख ३६ हजार ३२९ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हि माहिती दिली आहे.


राज्यात रुग्ण बरो होण्याचे प्रमाणही ९० टक्क्यांच्यावर आहे. हा नागरिकांसाठी मोठा दिलासा आहे. दिवाळी सणाच्या तोडांवर हे शुभसंकेत मिळत असताना नागरिकांनीही दिलासा व्यक्त केला आहे. मात्र, दिवाळीनंतर राज्यात करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनानंही जनतेला खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Advertisements

आज राज्यात ७ हजार ८०९ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळं राज्यात आजपर्यंत एकूण १६ लाख ०५ हजार ०५६ करोना बाधित रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२. ४४ टक्के इतके झाले आहे. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही एक लाखांहून कमी झाली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांत ८४ हजार ६२७ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. तर, राज्यात ८ लाख ११ हजार ०३५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ६ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Advertisements
Advertisements

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६ लाख, ६४ हजार २७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ३६ हजार ३२९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८, ११, ०३५ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत तर ६ हजार ४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ८४ हजार ६२७ अॅक्टिव्ह केसेस आहेत. आजज राज्यात ४ हजार ४९६ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १७ लाख ३६ हजार ३२९ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या १२२ मृत्यूंपैकी ८५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधील आहेत. तर ३७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत असंही महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने म्हटलं आहे.

आपलं सरकार