Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : एकाच घरात आढळले ६ मृतदेह , चार लहान मुलांचा समावेश

Spread the love

ओडिशाच्या बलांगिरी जिल्ह्यात एका घरातून एकाच कुटुंबातील ४ मुलांसह ६ जणांचे मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.  पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि मृत्यूच्या कारणांचा शोध सुरू आहे. दरम्यान हा खून आहे की आत्महत्या हे अद्याप पोलिसांना स्पष्ट करता आले नाही आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, त्यावेळी घरातच ६ मृतदेह आढळून आले. तपास अधिकारी म्हणाले की, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं खरं कारण समोर येईल. अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोरंजन प्रधान म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे.

दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानरापाडा गावात बुलू जानी (50), त्यांची पत्नी ज्योती (48) आणि त्यांची दोन मुलं आणि दोन मुली यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मुलांचे वय दोन ते १२ वर्षे  आहे. पटणागड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक प्रियंका राऊत्र यांच्या म्हणण्यानुसार प्रथमदर्शनी हा खुनाचा प्रकार आहे की आत्महत्येचा  हे अद्याप समजू शकलेले नाही आहे. ते पुढे म्हणाले की वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. संपूर्ण घराचा शोध घेतला जात आहे जेणेकरून घटनेची कारणं शोधला येतील. तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्थानिक लोकांनी बरेच दिवस घर आतून बंद असल्याचे सांगितल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली. काहींनी घर उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र घर लॉक असल्यामुळे त्यांनी पोलिसांना बोलवलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!