Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraCoronaUpdate : दिवसभरात आढळले ४९०७ नवे रुग्ण तर ९१६४ रुग्णांना डिस्चार्ज

Spread the love

गेल्या २४ तासात  ९ हजार १६४ जणांनी करोनावर मात केली. तर, राज्यात आतापर्यंत एकूण १५ लाख ९७ हजार २५५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ९२.२३ टक्के आहे. मागील काही दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. हे चित्र नक्कीच दिलासादायक असले तरी देखील नागरिकांनी सणासुदीच्या काळात अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे.

राज्यात काल  दिवसभरात ४ हजार ९०७ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, १२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या १७ लाख ३१ हजार ८३३ वर पोहचली आहे. यामध्ये ८८ हजार ७० अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १५ लाख ९७ हजार २५५ व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४५ हजार ५६० जणांच्या संख्येचा समावेश आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६ लाख ३२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ३१ हजार ८३३ (१८.०४टक्के) नमूने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९ लाख ४१ हजार ११८ व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये आहेत. तर ६ हजार ५५१ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

मुंबईत दिवसभरात १ हजार ६९ नवे करोनाबाधित आढळले, तर १ हजार ७१४ जण करोनामुक्त झाले. याशिवाय, २२ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. मुंबईतील करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ६६ हजार ७४६ वर पोहचली आहे. यामध्ये १२ हजार ६७४ अॅक्टव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले २ लाख ३९ हजार ८०० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १० हजार ५०३ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात २१७ नवे रुग्ण आढळल्याने, एकूण करोनाबाधितांची संख्या १ लाख ६३ हजार ८३६ एवढी झाली आहे. तर आज दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजअखेर ४ हजार ३६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ३८० रुग्णांची तब्येत ठीक झाल्याने त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर १ लाख ५४ हजार ८६५ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे. तर, पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १२५ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १०५ जण करोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ८९ हजार १११ वर पोहचली असून, यापैकी, ८६ हजार १४० जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६८ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!