Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : बिहारच्या विजयाबद्दल भाजपचा दिल्ली मुख्यालयात जल्लोष , मोदींनी वाढवले कार्यकर्त्यांचे बळ

Spread the love

बिहारमध्ये आपल्या जागा वाढल्यानंतर भाजपने बुधवारी दिल्लीतल्या मुख्यालयात मोठा जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक नेते या वेळी उपस्थित होते. बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीबरोबरच देशभरातल्या अनेक राज्यांमध्ये झालेल्या पोट निवडणुकींमध्येही भाजपला मोठं यश मिळालं आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. दोन जागांवरून भाजपचं कमळ देशभर फुललंय. जे विकासाच्या मुद्यावरून भरकटले त्यांना लोक स्वीकारणार नाहीत असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला. दरम्यान नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालीच बिहारचा विकास होईल असं सांगत पंतप्रधानांनी सर्वच चर्चेला पूर्णविराम दिला.


आपल्या भाषणतात काही पक्ष हे फक्त कुटुंबांपुरतेच मर्यादीत आहेत अशी टीकाही त्यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांची नावे न घेता केली. तरुणांनी भाजपसोबत येत देशाच्या विकासात सहभागी व्हावं असंही ते म्हणाले. देशाच्या विकासासाठी जे प्रामाणिकपणे काम करतील त्यांनाच लोक निवडून देतील. आता विकास हाच मुद्दा यापुढे राहिल हाच या निकालांचा अर्थ आहे असं मोदी म्हणाले. जे विकासापासून दूर जातील त्यांचं लोकांनी डिपॉझिट जप्त केलं असा टोलाही त्यांनी लगावला. देशातल्या सगळ्यांचा भरवसा हा आता फक्त भाजपवरच आहे असंही पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले, बिहार विधानसभा निवडणुका निकालांचे महत्त्व खूप मोठं आहे. देशभर कमळ खुललं आहे. देशातल्या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपचा झेंडा लोकांनीच फडकविला आहे. आम्ही फक्त दोन  होतो आता देशभर विस्तार झालाय असंही ते म्हणाले. बिहारमधलं यश हे पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांनी केलेल्या परिश्रमाचं फळ आहे. मतदारांनी सगळे अंदाज खोटे ठरवत लोकशाहीसाठी, विकासासाठी मतदान केलं असंही पंतप्रधानांनी सांगितलं. लोकांनी अतिशय उत्साहाने मतदान केलं. लोकशाहीवरच्या विश्वासाचं हे प्रतिक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. दरम्यान कोरोनाच्या काळात निवडणूक घेणं हे आव्हान होतं मात्र ते सगळ्यांनी यशस्वी पार पाडलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद असंही पंतप्रधान म्हणाले. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचंही पंतप्रधानांनी कौतुक केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!