Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharPoliticsUpdate : लोक आमच्या बाजूने तर निवडणूक आयोग एनडीएच्या बाजूने होता त्यामुळे ते निवडणूक जिंकले : तेजस्वी यादव

Spread the love

बिहार विधानसभा निवडणुकीत लोक आमच्या बाजूने होते मात्र निवडणूक आयोग एनडीएच्या बाजूने होता त्यामुळे ते निवडणूक जिंकले असा आरोप आता राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. अर्थात भाजपाने असे  करण्याची ही पहिली वेळ नाही. २०१५ मध्ये महाआघाडी स्थापन झाली त्यावेळीही जनमताचा कौल आमच्याच बाजूने होता मात्र भाजपाने मागच्या दाराने प्रवेश करुन सत्ता मिळवली असेही तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे. मी बिहारच्या जनतेचे आभार मानतो असेही  तेजस्वी यादव यांनी म्हटले आहे.

परवा बिहार निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर तेजस्वी यांनी आपल्या कार्यकत्यांसोबत निकालाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हि पत्रकार परिषद घेतली. या निवडणूक निकालात एनडीएला  १२५ तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. मात्र मतमोजणीच्या दरम्यान एनडीए आणि महाआघाडीत चांगलीच चुरस पाहण्यास मिळाली. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

दरम्यान निवडणूक निकालाच्या दिवशीही तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार हे मतमोजणी प्रक्रियेत ढवळाढवळ करत आहेत असा आरोप केला होता. महाआघाडीच्या विजयी उमेदवारांना पराभूत घोषित करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला. आता आज पुन्हा एकदा पत्रकार परिषदेत त्यांनी जनमताचा कौल हा आमच्या बाजूनेच होता मात्र निवडणूक आयोग एनडीएच्या बाजूने होता असा आरोप केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!