Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : गांजाविक्री प्रकरणात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगाराकडून पुन्हा गांजा विक्री, दोघांना बेड्या

Spread the love

औरंगाबाद- गांजा विक्री प्रकरणात गुन्हेशाखेने यापूर्वी अटक करुन आरोपपत्र दाखल केलेल्या गुन्हेगाराने लाॅकडाऊनचा फायदा घेत खंडपीठातून जामिन मिळवून पुन्हा गांजाविक्री सुरु करतांच गुन्हेशाखेने ७५हजार रु.च्या गांजासहित बेड्या ठोकल्या या प्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जावेदखान अय्युबखान(३५) रा. नूतनकाॅलनी व युसुफखान उमरखान(४४) रा. समतानगर अशी अटक आरोपींची नावे आहेत.जावैद जालन्याहून बीडबायपास मार्गे रोपळेकर चौकातून शहरात येत असतांना एपीआय अजबसिंग जारवाल यांनी सापळा रचून ११किलो गांजा, एक स्काॅर्पिओ दोन मोबाईल हॅंडसैट असा ५लाख ८५हजारांचा मुद्देमाल जप्त करंत अटक केली. जावेदखानला या पूर्वी मार्च एप्रिल २०दरम्यान गांजा तस्करीप्रकरणी गुन्हेशाखेनेच बेड्या ठोकल्या होत्या. या प्रकरणात त्याच्यावर आरोपपत्रही दाखल केले होते. लाॅकडाऊनचा फायदा घेत जावेदखान ने खंडपीठातून जामिन मिळवंत पुन्हा तस्करी सुरु केली होती.याची माहिती गुन्हेशाखेला लागताच त्वरीत कारवाई झाली.या कारवाईत पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल, पोलिस कर्मचारी शिवाजी झिने, व इतरांनी सहभाग घेतला होता. पुढील तपास उस्मानपुरा पोलिस करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!