Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharPoliticsUpdate : नाराज नितीशकुमार यांच्या चुप्पीमुळे भाजप अस्वस्थ !! महाराष्ट्राची पुनरावृत्ती टाळण्याचे जोरदार प्रयत्न तर तेजस्वीला सपोर्ट करण्याचे काँग्रेसचे आवाहन

Spread the love

बिहारचे निकाल एनडीएच्या बाजूने लागले असले तरी सरकार स्थापनेवरून ज्यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे ते नितीशकुमार मात्र निवडणूक निकालानंतर शांत असल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच कि , काय भाजपने स्वतःहून आमचे मुख्यमंत्री नितीशकुमारच राहतील असे सूतोवाच केले आहे. दरम्यान बिहारची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांनी , नितीशकुमार यांनी मोठे मन करून तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदासाठी साहाय्य करावं असं ट्विट केलं आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात काय होईल ? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.


बिहार निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात एनडीएचे प्रमुख म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त स्वतःचा चेहरा वापरून मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा चेहरा कुठल्याही जाहिरातीत न वापरल्याने स्वतः नितीश कुमार यांना आपल्या वेगळ्या जाहिराती करून स्वतः सोबत मोदींच्या फोटोचा वापर करावा लागला होता. शिवाय सीमांचल भागात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी भाजपच्या ध्येयधोरणानुसार आक्रमक प्रचार केला होता त्याचाही फटका नितीशकुमार यांच्या पक्षाला बसला अशी जेडीयू कार्यकर्त्यांची भावना आहे.

नितीशकुमार यांची शांती आणि भाजपची धाकधूक

दरम्यान बिहार निवडणुकीच्या प्रचारात जेडीयू एकटी पडल्याचे चित्र दिसले त्यामुळे नितीशकुमार यांना केवळ ४३ जागांवर समाधान मानावे लागत आहे. ज्या ठिकाणी जेडीयूचे उमेदवार होते तेथे भाजपची मदत झाली नाही असा जेडीयूच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान मतदानांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अमित शहा आणि भाजपच्या सर्व नेत्यांनी आपल्या विजयाबद्दल बिहारी जनतेचे आभार मानले परंतु नितीशकुमार यांनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. निवडणूक निकालानंतर आपली पुढंही रणनीती काय असावी याबद्दल नितीशकुमार आपल्या निवासस्थांनी पक्षाच्या नेत्यांची बैठक घेत आहेत. आज नितीशकुमार यांनी मौलाना अबुल कलाम आझाद यांना आदरांजली अर्पण करणारे ट्विट केले परंतू निवडणूक निकालावर कुठलेही भाष्य केले नाही.

महाराष्ट्राची पुनरावृत्ती घडू नये म्हणून…

महाराष्ट्रात शिवसेनेने भाजपसोबत जे केले ते नितीशकुमार यांनी करू नये म्हणून भाजपने अत्यंत सावध पवित्र घेत काहीही झाले तरी नितीशकुमार हेच एनडीएचे मुख्यमंत्री होतील असे जाहीर केले आहे . जरी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्री पदावर भाषणे दावा करावा असा दबाव आणला जात असला तरी. निवडणुकीच्या काळात संयुक्त सरकार असतानाही सरकारवरील नाराजीसाठी केवळ जेडीयूलाच टार्गेट करण्यात आल्यानेही नितीशकुमार नाराज आहेत.

नितीशकुमार हे एक अत्यंत संवेदनशील नेते

नितीशकुमार हे एक अत्यंत संवेदनशील नेते आहेत. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या वाईट पराभवानंतर नितीश कुमार यांनी राजीनामा दिला होता. हा त्यांचा नैतिक निर्णय मानला गेला. दरम्यानच्या काळात ते  भाजपपासून विभक्त झाले होते . मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपने जबरदस्त कामगिरी केल्यानंतर  नितीश यांनी जीतनराम मांझी यांना बिहारचे मुख्यमंत्री केले. परंतु त्यानंतर २२ फेब्रुवारी २०१५  रोजी त्यांनी पुन्हा चौथ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. पुन्हा त्याच वर्षी बिहारमध्ये घेण्यात आल्या आणि  दशकांपासून एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेले नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव एक झाले. महायुतीच्या अंतर्गत या दोघांनी एनडीएसमोर निवडणूक लढविली. दोन्ही पक्षांना ऐतिहासिक विजय मिळाला आणि २० नोव्हेंबर २०१५ रोजी नितीशकुमार यांनी ५ व्यांदा वेळी शपथ घेतली. मात्र जवळपास दोन वर्षांनी पुन्हा नितीशकुमार यांनी आरजेडीशी मतभेद झाले आणि ते पुन्हा भाजपसोबत एनडीएमध्ये दाखल झाले आणि  जुने सहकारी पुन्हा एकदा एकत्र आले. पण मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर नितीश यांची पकड तशीच राहिली.आणि २७  जुलै २०१७ रोजी सहाव्यांदा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता ताज्या निकालानुसार पुन्हा एकदाएनडीएने निवडणूक जिंकली असली तरी त्यांच्या पक्षाला केवळ ४३ जागा मॆल्याचे शल्य नितीशकुमार यांना असल्याने आता नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील कि , कि वेगळा निर्णय घेतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!