Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharPoliticalNewsUpdate : नितीशकुमारच होतील बिहारचे मुख्यमंत्री, भाजपने पुन्हा स्पष्ट केली भूमिका

Spread the love

भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्याने  नीतीश कुमार अद्याप काहीही बोलले नसले तरी तेच एनडीचे  मुख्यमंत्री बनतील असे  भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. नीतीश कुमार हेच मुख्यमंत्री बनतील, कारण ही आमची वचनबद्धता होती. यामध्ये कोणताही संभ्रम नाही, असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपते ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी  यांनी म्हटले आहे. निवडणुकांमध्ये असे होत असते. काही अधिक जागा जिंकतात, काही कमी. मात्र आम्ही समान भागीदार आहोत, असेही मोदी पुढे म्हणाले. ७ तारखेनंतर नितीशकुमार यांनी कुठलीही राजकीय प्रतिक्रिया दिली नाही हे विशेष.

मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाला भाजपपेक्षा कमी जागा झाल्याने नितीशकुमार नाराज आहेत . त्या पार्श्वभूमीवर  भारतीय जनता पक्षाकडून हे वक्तव्य आले आहे. आघाडीमध्ये मोठ्या भावाचा दर्जा हिरावून घेतल्यानंतर देखील नीतीश कुमार एनडीएचे मुख्यमंत्री होणार की नाही?, याबाबतची चर्चा सुरू झाली होती. अनेक लोक याबाबत प्रश्न विचारू लागले होते. त्यावर  भारतीय जनता पक्षाने हे उत्तर दिले आहे. २४३ सदस्यसंख्या असेलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ७५ जागा जिंकत राष्ट्रीय जनता दल हा सर्वात मोठा पक्ष म्हणून प्रथम स्थानी आला आहे. तर ७४ जागा जिंकत भारतीय जनता पक्ष दुसऱ्या स्थानी आहे. नीतीश कुमार यांच्या पक्षाने ४३ जागांसह तिसऱ्या स्थानी आहे. सत्तारूढ एनडीएला १२५ जागांसह बहुमत मिळाले आहे. विरोध पक्षांच्या महाआघाडीसा ११० जागा मिळाल्या आहेत. १२ जागांवर जय-परायजयात अतिशय कमी मतांचे अंतर आहे. हिलसा येथे जेडीयू उमेदवाराने मात्र १२ मतांनी राजद उमेदवाराचा पराभव केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!