Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharElectionResultUpdate : मतमोजणीत हेराफेरी झाल्याचा आरजेडीचा गंभीर आरोप , निवडणूक आयोगाकडे करणार तक्रार

Spread the love

बिहारमध्ये २४३ जागांसाठीची मतमोजणी सुरू असताना  राष्ट्रीय जनता दल (आरजेडी ) आणि काँग्रेसच्या महागठबंधनचा ११९ जागांवर विजय झाल्याचा दावा आरजेडीने केला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार  हे फोन करून अधिकाऱ्यांना फेरफार करण्यास सांगत असल्याचा  गंभीर आरोप आरजेडीने केला आहे.  या प्रकाराबाबत  महागठबंधनमधील काँग्रेस, आरजेजडीसह सर्व पक्षांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. नितीशकुरांविरोधात तक्रार केली जाण्याची शक्यता आहे.


दरम्यान आरजेडीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करत नितीशकुमारांवर गंभीर आरोप केलेत. निवडणुकीत महागठबंधनच्या उमेदवारांचा ११९ जागांवर विजय झाला आहे. रिटर्निंग अधिकाऱ्यांनी विजयाबद्दल उमेदवारांचं अभिनंदनही केले . पण आता त्यांना प्रमाणपत्र देण्यास नकार देत आहेत आणि तुमचा पराभव झाल्याचं सांगत आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरही उमेदवार विजयी झाल्याचं दाखवत आहेत. यामुळे लोकशाहीत अशी लूट चालणार आहे, असं आरजेडीने म्हटलं आहे.

याबाबत आरजेडीने दोन ट्विट केले असून दुसऱ्या ट्विटमध्ये संयुक्त जनता दलाचे नेते आणि मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर आरजेडीने आरोप केला आहे. निवडणुकीत महागठबंधनच्या ११९ उमेदवारांचा विजय झाला आहे. पण वृत्तवाहिन्यांवर १०९ उमेदवर विजयी झाल्याचं दाखवलं जात आहे. नितीशकुमार हे अधिकाऱ्यांना फोन करून मतमोजणी फेरफार करत आहेत. अंतिम निकाल लागल्यावर आणि विजयाच्या शुभेच्छा दिल्यावर अधिकरी आता तुम्ही पराभूत झाल्याचं सांगत आहेत. मतमोजणीत मोठा घोळ सुरू आहे, असा गंभीर आरोप आरजेडीने केला आहे.

आरजेडीने म्हटले आहे कि , नितीशकुमार हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणून कठोर निर्देश जारी करत आहेत. महागठबंधनला काहीही करून १०५ ते ११० जागांवर रोखण्यास सांगण्यात येत आहे. लोकशाहीत ही लूट चालणार नाही. जवळपास १० जागांवर नितीशकुमार प्रशासन मतमोजणीत जाणूनबुजून दिरंगाई करत आहे. विजयी उमेदवारांना प्रमाणपत्र दिले जात नाही. मुख्यमंत्री कार्यालयात बैठक घेऊन नितीशकुमार आणि सुशील मोदी आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रधानसचिवांमार्फत जिल्हाधिकारी आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांना फोन करत आहेत. मतांचे कमी अंतर असलेल्या जागांवर आपल्या बाजूने निर्णय घेण्यास दबाव टाकत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!