Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharElectionResultUpdate : बिहारच्या विजयाबद्दल बिहारचे आभार मानून फडणवीस यांनी पंतप्रधानांचे केले अभिनंदन

Spread the love

चौथ्यांदा बिहारमध्ये एनडीएला सरकार बनविण्याची संधी मिळत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर बिहारचे प्रभारी  महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या निकालावर आपली प्रतिक्रिया देताना बिहारच्या जनतेचे आभार मानले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

आपल्या ट्विटमध्ये फडणवीस यांनी म्हटले आहे कि , ‘आम्हाला जंगलराज नको तर विकास हवा आहे, हे बिहारच्या जनतेने आज स्पष्ट केले आहे. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही जनतेने पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले असून नितीशकुमार यांच्यावरही विश्वास व्यक्त केला आहे. यासाठी बिहारच्या जनतेला मी कोटी कोटी धन्यवाद देतो’, असे फडणवीस यांनी नमूद केले आहे. बिहार निवडणुकीदरम्यान फडणवीस यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे फडणवीस यांना प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात बिहारमध्ये जाता आले नाही. करोनावर मात केल्यानंतर ते सध्या विश्रांती घेत असून बिहारच्या यशावर त्यांनी रात्री उशिरा आपली प्रतिक्रिया दिली.

त्यांनी पुढे म्हटले आहे कि , बिहारमध्ये ऐन कोरोनाच्या काळात निवडणुका पार पडल्या. लोकशाहीच्या या उत्सवात जनतेने उत्साहाने सहभाग नोंदवला आणि जगासमोर एक आदर्श उदाहरण ठेवलं आहे. या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो. देशभरात ११ राज्यांमध्येही पोटनिवडणुका पार पडल्या. या राज्यांत भाजपला चांगले यश मिळाले आहे. त्यासाठी फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!