MumbaiPuneNewsUpdate : कर्तव्य बजावताना बोनेटवर फरफटत नेलेल्या ” त्या ” वाहतूक पोलिसाचा गृहमंत्र्यांनी केला सत्कार

Spread the love

पिंपरी चिंचवड मध्ये मास्क विचारल्याचा राग आल्याने बोनेटवर टाकून एक किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेलेले वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत यांच्या  कार्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कौतुक केले. कर्तव्यावर असताना एका चालकाने सावंतांना ठोकर दिली, तेव्हा ते बोनेटवर पडले होते. अशा परिस्थितीत त्या चालकाने एक किलोमीटर अंतर सुसाट गाडी पळवली होती. यावेळी मदतीला धावलेलल्या प्रत्यक्षदर्शीं तरुणांसह काही रिक्षा चालक आणि कार चालक यामुळे चालकाला बेड्या ठोकण्यात आणि वाहतूक पोलिसाचा जीव वाचवण्यात यश आले होते. याचा थरार कॅमेऱ्यातून सर्वांसमोर आला. त्यानंतर आज गृहमंत्री देशमुखांनी सावंतांना मुंबई बोलवून त्यांचं कौतुक केलं. यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ही उपस्थित होते.


गेल्या ५ दिवसांपूर्वी  सायंकाळी चारच्या सुमारास पिंपरी चिंचवडमधील अहिंसा चौकात वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत आणि इतर कर्मचारी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. तेव्हा चिंचवड स्टेशन चौकाकडून चाफेकर चौकाकडे ५० वर्षीय युवराज हणवते त्यांच्या चारचाकीतून निघाले होते. पण त्यांनी घातलेला मास्क हा नाक आणि तोंड सोडून गळ्याजवळ असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. म्हणून कारवाईसाठी त्यांना हात दाखवला असता हणवते पोबारा करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, त्यांच्या पुढे वाहतूक पोलीस आबासाहेब सावंत आले आणि त्यांनी गाडी रोखली.

दरम्यान हणवतेंनी थोडावेळ थांबल्याचे नाटक करीत गाडी रेस केली तेंव्हा  सावंत यांच्या पायाला धक्का लागून ते बोनेटच्या दिशेने पडले . ते बोनेट वरून खाली उतरणार तोवर हणवते यांनी गाडीचा वेग वाढवला. ही बाब काही उपस्थित दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांनी पाहिली आणि त्यांनी हणवतेच्या गाडीचा अहिंसा चौकापासून चाफेकर चौका पर्यंत पाठलाग केला तेंव्हा हणवते यांनी गाडीचा वेग आणखीच वाढवला. गाडी चिंचवड पोलीस स्टेशनसमोर आली, तेव्हा दोन्ही बाजूंनी दोन दुचाकीस्वार, पुढे एक रिक्षा असं घेरण्यात आलं. पण चारचाकी सुसाट होती. सावंत जीव मुठीत घेऊन बोनेटला कसेबसे धरून बसले होते. काही केल्या हणवते थांबायचं नाव घेईना, शेवटी एक दुचाकीस्वाराने शक्कल लढवली आणि पुढे धावणारी मोठी चारचाकी गाडी रस्त्यात थांबवली. तेव्हा मात्र हणवतेसमोर पर्याय उरलाच नाही. गाडी थांबताच सावंतांसह सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मग हणवतेंकडे सर्वांनी मोर्चा वळवला, उपस्थितांनी गाडीला घेरलं आणि हणवतेला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या.

आपलं सरकार

You have successfully subscribed to the newsletter

There was an error while trying to send your request. Please try again.

will use the information you provide on this form to be in touch with you and to provide updates and marketing.