Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharElectionResult : LiveCurrentUpdate : पहाटे चार वाजता संपली मतमोजणी , शेवटच्या दोन्हीही जागा एनडीएला, पहा सर्व निकाल

Spread the love

बिहार विधानसभेसाठीची  काल मंगळवारी  सकाळी 8 वाजता सुरु झालेली मतमोजणी बुधवारी  पहाटे 4 पर्यंत चालू होती.  दरम्यान कोरोना प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाकडून कर्मचाऱ्यांना पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्याने अत्यंत संथ गतीने मतमोजणी चालू  होती . काल  दिवसभरात एनडीए आणि महा आघाडी यांच्यातील चुरस वाढली होती . ज्याला काट्याची टक्कर असे म्हटल्यास वावगे ठरू नये. बिहारमध्ये संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मतमोजणीच्या 4858 फेऱ्या झाल्या होत्या. मोतमोजणीच्या एकूण 7737 फेऱ्यांचे नियोजन केल्याची माहिती निवडणूक आयोगाचे उपायुक्त आशिष कुंद्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली होती .


आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत 240 जागांचे निकाल हाती  आले असून 03 जागांची मतमोजणी चालू आहे.

1. राष्ट्रीय जनता दलाने  75 जागा जिंकल्या आहेत. 

2. भाजपने 74 जागा जिंकल्या आहेत.

3. जनता दल युनायटेडने  43 जागा जिंकल्या आहेत.

4. काँग्रेसने 19 जागा जिंकल्या आहेत.

सीपीआय मार्किस्ट – लेनिनने 12 जागा जिंकल्या आहेत.

एमआयएमला 4  जागा मिळाल्या असून 1 जागांवर त्यांची आघाडी आहे.

बहुजन समाज पार्टीने 1 जागा जिंकली आहे.

सीपीआयने 01 जागा जिंकली असून 02 ठिकाणी आघाडीवर आहे.

सीपीआय एम ने 02  जागा जिंकल्या आहेत.

हिंदुस्थानी आवाम  मोर्चाने 03 जागा जिंकल्या असून 01 जागा आघाडीवर आहे.

लोजपाने 01जागा जिंकलेली आहे .

विकासशील इन्सान पार्टीने 4  जागा जिंकल्या आहेत.

बिहार विधानसभेच्या २४३ जागांचे निकाल रात्री उशिरा हाती येण्याची शक्यता आहे. संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत ३ कोटी मतांची मोजणी झाली होती. मतमोजणी दिवसभर आघाडीवर असलेली एनडीए संध्याकाळनंतर काहीशी मागे पडली आहे. आता बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस महाआघाडी ( महागठबंधन ) एनडीएमध्ये आता बोटावर मोजण्याइतक्या जागांचा फरक आहे. यामुळे बिहारमध्ये कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता आहे.

कोरोना संकटामुळे निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार बिहारमध्ये निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. मतमोजणीदरम्यान करोना व्हायरस संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जात आहे. यामुळे कुठल्याही घाईघाईत कुठलाही निकाल जाहीर करू नका. आवश्यक तेवढ्या वेळातच मतमोजणी पूर्ण करा, असे आदेश निवडणूक आयोगाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. करोनामुळे मतमोजणीच्या नियमांमध्ये बदल झाल्याने मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालेल, असं आयोगाने म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!