Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : बलात्काराच्या गुन्ह्यात अपत्य, फिर्यादी आरोपींची लगीनघाई , पोलिसांसमोर मोठा पेच !!

Spread the love

औरंगाबाद -अल्पवयीन मामेबहीणीशी अनैतिक संबंधातून अपत्य प्राप्ती झाल्यानंतर पिडीतेच्या आईने व आरोपींनी लग्नाची तयारी सुरु करताच दुसरा गुन्हा घडू नये म्हणून हर्सूल पोलिसांनी हे प्रकरण योग्य निवाड्यासाठी चाईल्डवेलफेअर कमिटीपुढे ठेवले.व आरोपी फिर्यादींना कमिटीचे आदेश येई पर्यंत तटस्थ राहण्याची ताकिद दिली.

गेल्या फेब्रुवारी मधे हर्सूल पोलिस ठाण्यात पोक्सो सहित बलात्काराचा गुन्हा दाखल झाला हौता. आरोपी आत्येभाऊच असल्यामुळे अटक झाल्यावर फिर्यादी व आरोपीच्या पालकांनी मिळून जामिनावर मुक्तता केली. व नतर पिडीतेच्या आईने पिडीतेचे बाळंतपण करण्याचा निर्णय घेतला.व पिडीतेला बुधवारी अपत्य प्राप्ती झाली.अपत्य प्राप्तीच्या आनंदात फिर्यादी व आरोपी कडील सर्वांनी हर्सूल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन इंगोले यांना विनंती केली.की, पिडीतेला व तिच्या अपत्याला सांभाळ करण्याची परवानगी द्यावी.परवानगी देण्यापूर्वी पोलिस निरीक्षक इंगोले यांनी तज्ञांशी या प्रकरणात चर्चा केली.

तज्ज्ञांच्या  मते पिडीतेची आई गुन्हा दाखल झाल्यानंतर पिडीता व तिच्या अपत्याचा सांभाळ करु शकंत नाही या मधे पोलिस प्रशासन अडचणीत येऊ शकते.तसेच आरोपी आणि फिर्यादी दोन्ही अल्पवयीन व अशिक्षीत असल्यामुळे बालविवाहाचा दुसरा गुन्हा घडू शकतो. यात पोलिसांवरही बालविवाहाला संमती देण्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो. हा सर्व संभाव्य घटनाक्रम टाळण्यासाठी योग्य आदेशाकरता हे प्रकरण चाईल्ड वेलफेअर कमिटीपुढे ठेवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!