Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AmericaPresidentElection : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्रपती जो बायडन यांनी विरोधकांनाही घातली साद

Spread the love

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी जो बायडन यांची निवड झाली हे ट्रम्प समर्थक मानायला तयार नाहीत त्यांना साद घालताना जो यांनी म्हटले आहे कि , राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना मतं दिली होती त्यांची निराशा झाली असणार हे मी समजू शकतो. आता एकमेकांना संधी देऊयात. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं आपण आता थांबवलं पाहिजे. आपण एकमेकांनी नव्या दृष्टीकोनातून एकमेकांकडे पाहिलं पाहिजे” असं आवाहन जो बायडन यांनी केलं आहे.

बायडन यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्राध्यक्षपदासाठी प्रचंड  मतदान करून अमेरिकेच्या जनतेने मला विजयी केले आहे.  त्यामुळे आपला विजय हा निर्भेळ आहे. मी अमेरिकेचा अध्यक्ष या नात्याने तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छितो की मी विभाजनाचे राजकारण करणार नाही. एकात्मतेसाठी प्रयत्न करेन. मला रिपब्लिकन किंवा डेमोक्रॅट्स अशी वेगळी राज्यं दिसत नाहीत. तर फक्त एकसंध अमेरिकाच दिसते आहे असंही बायडन यांनी सांगितलं.

दरम्यान मतमोजणीनंतर जो बायडन विजयी झाल्याचं समजताच डोनाल्ड ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा मतमोजणी प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ज्या लोकांनी कधीही मेल बॅलेट्स मागितलेच नव्हते त्यांच्याकडेही बॅलेट्स पाठवण्यात आले असाही आरोप ट्रम्प यांनी केला असून ते उद्या सोमवारी न्यायालयाची पायरी चढत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!