Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AmericaPresidentElction : ट्रम्प है के मानते नही !! बायडनच्या विजयावर त्यांचा भरोसा नाही , “असे” आहेत त्यांचे आरोप

Spread the love

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटीक पक्षाचे उमेदवार जो बायडन विजयी झाले असले तरी हा निकाल मान्य करण्यास डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही परिस्थितीत तयार नाहीत . या निवडणुकीत आपलाच विजय झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे . आपणच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी असून आपणास सात कोटी वैध मते मिळाली असा त्यांचा दावा आहे. या निवडणूक निकालाच्या विरोधात ते सोमवारी न्यायालयात जाणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मेल-इन आणि मतपत्रिकांबाबत गैरप्रकार झाला असल्याचा आरोप केला आहे. मतदानाच्या दिवशी रात्री आठ वाजल्यानंतरही बेकायदेशीरपणे मतदान सुरू होते. त्यावेळी हजारो मतदान झाले. त्याच्या परिणामी पेन्सिलवेनिया आणि इतर काही राज्यांतील  निकाल बदलले असल्याचा आरोप  केला आहे. अमेरिकेत दोन प्रकारे मतदान केले जाते. मतदार मतदानाच्या दिवशी  प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकतो किंवा पोस्टल मतदानाद्वारे मतदार आपले मतदान करू शकतो. प्रत्येक राज्यात याबाबत वेगवेगळे नियम असून त्या नियमांतर्गत घोषणा केल्या जातात. मात्र ज्या मतदारांना पोस्टल मतदान करायचे आहे, त्यांना आधीच नोंदणी करावी लागते.

दरम्यान अमेरिकेत मतमोजणी सुरू झाली तेव्हा तीन नोव्हेंबर रोजी झालेल्या प्रत्यक्ष मतांची मोजणी करण्यात आली. त्यानंतर पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आपला विजय होत होता. मात्र, पोस्टल मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर बायडन यांनी आघाडी घेतली असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेकांना पोस्टल मतदानाला प्राधान्य दिले होते. त्याशिवाय, डेमोक्रॅटीक पक्षानेदेखील पोस्टल मतदानाला घेऊन मोठी मोहीम सुरू केली होती. त्यामुळे डेमोक्रॅटीक पक्षाच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर पोस्टल मतदान केले. पोस्टल मतदान करण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी होता. आता, ट्रम्प यांनी पोस्टल मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!